तुमच्या मोबाईलमध्ये बऱ्याचदा नेटवर्क न मिळण्याच्या समस्येचा सामना तुम्ही केला असेल यात शंका नाही. मात्र ज्यावेळी मोबाईमध्ये नेटवर्क नसते तेंव्हा तुम्हाला इमर्जन्सी कॉल करण्याचा पर्याय मिळतो. कोणत्याही नेटवर्कशिवाय तुम्ही इमर्जन्सी नंबरवर कॉल करू शकता. इमर्जन्सी कॉलमध्ये तुम्ही पोलीस, रुग्णवाहिका इत्यादी ठिकाणी कॉल करू शकता. पण, फोनमध्ये नेटवर्क नसतानाही इमर्जन्सी कॉल कसा केला जातो? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया फोनमध्ये नेटवर्क नसतानाही कॉल कसा कनेक्ट केला जातो.

असा जोडला जातो फोन –

Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
robbing shopkeepers
दुकानदारांना लुटण्याचा हा नवीन प्रकार तुम्ही पाहिला आहे का? व्हिडीओ पाहा अन् सतर्क व्हा
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच
ed recruitment 2024 sarkari naukri officer job in ed full form needs qualification apply enforcement directorate gov in
ED Sarkari Job: ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! फक्त ही पात्रता आहे आवश्यक, मिळू शकतो १,५१,००० पर्यंत पगार

हेही वाचा- पर्सनल इन्स्टाग्राम अकाउंटचे रुपांतर प्रोफेशनल अकाउंटमध्ये करण्यासाठी फॉलो करा ‘या’ ४ सोप्या स्टेप्स

जेव्हा तुमच्या फोनमध्‍ये कोणतेही नेटवर्क नसते, याचा अर्थ तुमचा फोन ऑपरेटर नेटवर्कशी तुम्ही जोडले जाऊ शकत नाही. या परिस्थितीत इमर्जन्सी कॉल दुसऱ्या मार्गाने जोडला जाऊ शकतो. वास्तविक, जेव्हा तुमचा फोन त्याच्या ऑपरेटरच्या नेटवर्कशी कनेक्ट होत नाही, त्यावेळी तो त्या भागात उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही मोबाइल नेटवर्कशी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. या परिस्थितीत इमर्जन्सी कॉल कोणत्याही नेटवर्कद्वारे कनेक्ट केले जाऊ शकतात.

हेही वाचा- एका डझनमध्ये फक्त १२ अंडी किंवा केळी का असतात? १० किंवा १५ का नाही? कारण जाणून व्हाल थक्क

त्यामुळे अशा परिस्थितीत, जेव्हा सामान्य कॉल करता येत नाहीत, तेव्हा इमर्जन्सी कॉल कनेक्ट केला जातो. शिवाय जेव्हा कधी तुम्ही इमर्जन्सी कॉल करता तेव्हा सर्वात आधी तो कोणत्याही नेटवर्कचा वापर करून कनेक्ट करता येईल यालाच प्राधान्य दिले जाते. अशावेळी कोणत्यातरी ठराविक नेटवर्कद्वारेच फोन कनेक्ट करणे गरजेचे नसते. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत इमर्जन्सी कॉल करता येतो.

कॉल कसा कनेक्ट होतो?

तुम्ही इमर्जन्सी कॉल करता तेव्हा तो कॉल कसा रिसिव्ह केला जातो, याबाबतची माहिती जाणून घेऊया. तुम्ही जेव्हा एखाद्याला इमर्जन्सी कॉल करता तेव्हा आधी फोनद्वारे तो मेसेज जवळच्या नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर टॉवरला जातो आणि तिथून तुम्हाला कॉल करायचा असलेल्या टॉवरपर्यंत मेसेज पोहोचतो आणि तुमचा कॉल संबंधित फोनशी जोडला जातो. हे काम काही क्षणात पूर्ण होते आणि तुम्ही कोणाशीही इमर्जन्सी संवाद साधू शकता.