UPSC परीक्षा देणाऱ्यांनी एकदा वाचाच, IAS अधिकारी झाल्यावर वेतन किती? घर, गाडीसह 'इतक्या' सुविधा मिळणार | ias officer monthly salary and facilities know everything about Indian Administrative Services exam upsc exam in india nss 91 | Loksatta

UPSC परीक्षा देणाऱ्यांनी एकदा वाचाच, IAS अधिकारी झाल्यावर वेतन किती? घर, गाडीसह ‘इतक्या’ सुविधा मिळणार

IAS अधिकारी झाल्यावर कोणत्या सुविधा मिळतात आणि प्रत्येक महिन्याला किती वेतन मिळतं? वाचा सविस्तर माहिती.

Indian Administrative Services
आएएस अधिकाऱ्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. (Image-The Indian Express)

Indian Administrative Services : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आएएस बनण्याची संधी मिळते. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतातील शासकीय सेवेत नोकरी करण्याची संधी मिळते. एका आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती वेगवेगळ्या मंत्रालयात आणि प्रशासकीय विभागात केली जाते. आएएस अधिकाऱ्यासाठी सर्वात मोठं पद कॅबिनेट सचिव असतं. जिल्हाधिकारी किंवा अन्य एखाद्या पदावर नियुक्त झालेल्या आयएएस अधिकाऱ्याचं वेतन किती असतं आणि त्या अधिकाऱ्याला कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

सातव्या वेतन आयोगानुसार IAS अधिकाऱ्याला मिळणारं वेतन

सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) कोणत्याही आयएएस अधिकाऱ्याला प्रत्येक महिन्याला ५६१०० रुपये मूळ वेतन मिळतं. याशिवाय त्या अधिकाऱ्याला टीए, डीए आणि एचआरएसह इतर भत्ते मिळतात. रिपोर्ट्सनुसार, सर्व भत्ते मिळून एका आएएस अधिकाऱ्याला सुरुवातीच्या दिवसात १ लाख रुपयांहून अधिक वेनत दर महिन्याला मिळतं. आएएस अधिकाऱ्याचं सर्वात उच्च पद म्हणजे कॅबिनेट सचिव झाल्यानंतर एका आएएस अधिकाऱ्याला प्रत्येक महिन्याला जवळपास २.५ लाख रुपये वेतन आणि आणि अन्य भत्ते दिले जातात.

कोणत्या पदासाठी किती मूळ वेतन?

एसडीएम, अंडर सेक्रेटरी, असिस्टेंट सेक्रेटरीच्या पदासाठी ५६१०० रुपये, एडीएम, डेप्यूटी सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरीच्या पदासाठी ६७,७०० रुपये, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जॉइंट सेक्रेटरी, डेप्यूटी सेक्रेटरीच्या पदासाठी ७८८०० रुपये, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, डेप्यूटी सेक्रेटरी, डायरेक्टरच्या पदासाठी ११८५०० रुपये, डिव्हिजनल कमिश्नर, सेक्रेटरी कम कमिश्नर, जॉइंट सेक्रेटरीच्या पदासाठी १४४२०० रुपये, डिव्हिजनल कमिश्नर, प्रिंसिपल सेक्रेटरी, अॅडिशनल सेक्रेटरीच्या पदासाठी १८२२०० रुपये, अॅडिशनल चीफ सेक्रेटरीच्या पदासाठी २०५४०० रुपये, चीफ सेक्रेटरी आणि सेक्रेटरीच्या पदासाठी २२५००० रुपये, कॅबिनेट सेक्रेटरी पदासाठी २५०००० रुपयांचं मूळ वेतन मिळतं.

वतेनसह मिळतात मोठमोठ्या सुविधाएका आयएएस अधिकाऱ्याला वेतनाशिवाय वेगवेगळ्या पे बॅंडच्या हिशोबात अन्य मोठ्या सुविधाही मिळतात. आएएस अधिकाऱ्याला मूळ वेतनाशिवाय डिअरनेस अलाउंस (DA), हाउस रेंट अलाउंस (HRA), सब्सिडाइज्ड बिल, मेडिकल अलाउंस आणि कन्वेंस अलाउंस मिळतं. याशिवाय पे बॅंडनुसार, एका आएएस अधिकाऱ्याला घर, सिक्योरिटी, कुक आणि अन्य स्टाफसह अनेक सुविधा मिळतात. आएएस अधिकाऱ्याला प्रवासासाठी गाडी आणि चालकाची सुविधाही दिली जाते. बदली झाल्यावर टॅवल अलाउंसशिवाय सरकारी घरंही दिलं जातं.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 09:55 IST
Next Story
कारखान्यांच्या छतावर असलेली घुमटवजा वस्तू नेमकी का लावली जाते? जाणून घ्या खरं कारण