scorecardresearch

भारतीय रेल्वेच्या ‘या’ स्थानकात रोज प्रवासी तिकीट काढतात पण प्रवास करतच नाहीत! कारण वाचून म्हणाल, “किती हुश्शार”

Indian Railway: या स्थानकावर साधारण गाड्या रोज थांबतात. व हे रहिवाशी या गाड्यांसाठी रोज तिकिटे काढतात पण हो प्रवास मात्र…

Indian Railway Station Where People Buy Money But Dont Travel In Train Reason Behind It Will Shock You Saving Money
रोज ट्रेनचं तिकीट काढतात पण प्रवास करत नाही कारण… (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Indian Railway Interesting Facts: ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट काढावं लागू नये याच्या प्रयत्नात अनेकजण असतात. भारतीय रेल्वेचा प्रवास हा जगभरातील सर्वात स्वस्त सार्वजनिक वाहतुकींपैकी एक आहे आणि तरीही अनेक असे प्रवासी आहेत ज्यांना तिकीट न काढणे हे अधिक शौर्याचे वाटते. पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. जशी फुकट प्रवासाला उत्सुक मंडळी आहेत तशीच आपल्या भारतात प्रामाणिक लोकंही आहेत. भारतातील एका रेल्वे स्टेशन परिसरात राहणारी मंडळी तर इतकी प्रामाणिक आहेत की रेल्वेने प्रवास करायचा नसला तरीही रोज जाऊन ते स्टेशनवर रेल्वेचे तिकीट काढतात. आता यामागे नेमकं कारण काय हे आज आपण पाहूया..

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशानुसार तत्कालीन रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी प्रयागराजजवळच् दयालपूर हे स्थानक बांधले होते. पण हे स्थानक २०१६ मध्ये बंद करण्यात आले. भारतीय रेल्वेने काही नियम ठरवून दिली आहेत जर एखाद्या स्थानकावर त्या नियमांचे पालन होत नसेल तर रेल्वेकडे हे स्टेशन बंद करण्याचा सुद्धा अधिकार असतो.

यातीलच एक नियम म्हणजे, मेन लाईनवर एखादे स्टेशन असेल तर तिथे रोज किमान ५० तिकिटे काढली गेली पाहिजेत. तर स्टेशन ब्रँच लाईनवर असेल तर तिथे दररोज किमान २५ तिकिटे विकली गेली पाहिजेत. भारतीय रेल्वेने ठरवून दिलेल्या या नियमाची पूर्तता न केल्याने दयालपूर स्थानक बंद करण्यात आले होते. मात्र यामुळे येथील कमी संख्येत असलेल्या पण गरजू प्रवाशांची कोंडी होऊ लागली. हे स्थानक पुन्हा सुरु करण्यासाठी आजूबाजूच्या गावातील रहिवाशांनी अनेकदा अर्ज केले होते.

हे ही वाचा<< BCCI टीम इंडियाच्या खेळाडूंना किती मानधन देतं? वार्षिक करार यादीत रोहित- विराटला ‘इतके’ कोटी तर सूर्याला फक्त…

दरम्यान, २०२२ मध्ये रेल्वे मंत्रालयाने रहिवाशांचा अर्ज स्वीकारून हे स्थानक पुन्हा सुरु केले होते. तेव्हापासून रेल्वेचे नियम पूर्ण करण्यासाठी या रहिवाशांनी आपापसात ठरवून व एक रक्कम गोळा करून रोज किमान आवश्यक तिकिटे काढण्याचा निर्णय घेतला. या स्थानकावर साधारण १-२ गाड्या रोज थांबतात. व हे रहिवाशी या गाड्यांसाठी रोज तिकिटे काढतात पण हो प्रवास मात्र क्वचितच करतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 13:45 IST

संबंधित बातम्या