भारतात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल अनेकांना माहीत नसते. तुम्हाला माहित आहे का भारतात अशी काही रेल्वेस्टेशन आहेत ज्याची नावे अगदी छोटी आहेत. या स्टेशनची नावे वाचून तुम्हीही थक्क व्हाल. भारतातील या दोन स्टेशनची माहिती कदाचित काहीजणांनाच माहीत असेल. जर तुम्हालाही या स्टेशनबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी याबद्दल आश्चर्यकारक माहिती घेऊन आलो आहोत. भारतातील 'या' दोन रेल्वेस्टेशन बद्दल एकदा जाणून घ्याच.. भारतातील IB हे रेल्वे जगातील सर्वात छोट्या नावाचे रेल्वेस्टेशन आहे. ज्याच्याबद्दल अनेकांना माहीत असेल. मात्र भारतात अजून एक रेल्वेस्टेशन आहे त्याचे नावंही अगदी छोटे आहे. जे इंग्रजी अक्षरांमध्ये सर्वात लहान आहे. गुजरात हे खूप मोठे राज्य आहे, जिथे लोकसंख्या लाखो-कोटींच्या घरात आहे. तथापि, असे काही चमत्कार याठिकाणी पहायला मिळतात जे संपूर्ण जगात कोठेही नाहीत. असेच एक ओड (OD) रेल्वे स्थानक आहे जे सर्वात लहान रेल्वे स्थानकांच्या नावांमध्ये गणले जाते. ( हे ही वाचा: भारतात ‘हा’ आहे सर्वात लहान रेल्वे मार्ग; अवघ्या ९ मिनिटांत संपतो प्रवास..) ओड रेल्वेस्टेशन या राज्यात आहे.. ओड रेल्वे स्टेशन हे भारताच्या गुजरात राज्यातील पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील एक रेल्वे स्थानक आहे. ओड रेल्वे स्टेशन आनंद जंक्शन आणि गोधरा जंक्शनला रेल्वेने जोडलेले आहे. ओड रेल्वे स्थानक हे भारतातील सर्वात लहान स्थानकाचे नाव देखील आहे. हे भारतातील आनंद जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. हे भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या वडोदरा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.