Train Coach Booking for Marriage : भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीचे प्रत्येक निर्णय घेतले जातात. यात आता लग्नासाठी किंवा सहलीसाठी कुटुंबाला एकत्र ट्रेनमध्ये घेऊन जाण्यासाठी रेल्वेने संपूर्ण कोच बुक करण्याची सुविधा दिली आहे.

अनेकदा लग्न किंवा सहलीसाठी आपण कुटुंबीयांसोबत ट्रेनने एकत्र जाण्याचा विचार करतो, पण या वेळी एकाच कोचमध्ये सीट मिळत नसल्याने सगळ्यांना वेगवेगळ्या सीट्स किंवा ट्रेनच्या कोचमध्ये बसावे लागते. या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात अनेकदा समान हरवण्याची किंवा खर्चाचीही चिंता असते.

Viral video petrol is being poured into the scooter from tansen tobacco pouch
VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात
RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Perfect 7 Times To Drink Water In 24 Hours
दिवसभरात पाणी पिण्यासाठी ‘या’ ७ वेळा आहेत परफेक्ट! २४ तासांत कधी पाणी प्यावं? वाचा फायदे

पण आता डेस्टिनेशन वेडिंग किंवा कुठे फिरायला जाण्यासाठी तुम्ही संपूर्ण कुटुंबीयांसाठी किंवा मित्रपरिवारासाठी ट्रेनचा संपूर्ण कोच आरक्षित करू शकता. यासाठी आयआरसीटीसीकडून फूल टॅरिफ रेट किंवा FTR सर्व्हिस दिली जाते. ज्या माध्यमातून तुम्ही ट्रेनचा संपूर्ण कोच किंवा ट्रेन आरक्षित करू शकता.

ट्रेनचा संपूर्ण कोच बुक करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

१) सर्वप्रथम तुम्ही https://www.ftr.irctc.co.in/ftr/ या अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर येथे तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल.

२) यानंतर तुम्हाला येथे कोच किंवा संपूर्ण ट्रेन बुक करण्याचा पर्याय मिळेल. यातून तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही एक पर्याय निवडू शकता. यानंतर तुम्हाला प्रवासाची तारीख, कोचचा प्रकार इत्यादी तपशील मिळतील.

३) यानंतर तुमच्या समोर पेमेंट पेज ओपन होईल. जिथे तुम्ही पेमेंट करू शकता. यानंतर तुमचा कोच किंवा ट्रेन बुक केली जाईल.

संपूर्ण ट्रेन किंवा कोणताही एक डबा बुक करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण नियमांबद्दलदेखील जाणून घ्यावे. तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी किंवा गटासाठी AC प्रथम श्रेणी, AC 2-Tier, AC 3-Tier, AC 2 cum 3 Tier, AC चेअर कार, स्लीपर अशा कोणत्याही वर्गात बुक करू शकता.

रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुम्ही रेल्वेचा संपूर्ण कोच बुक करत असाल तर तुम्हाला एकूण भाड्यापेक्षा ३० ते ३५ टक्के जास्त भाडे द्यावे लागेल. यासोबतच तुम्हाला प्रवासानंतर परत मिळणारी सुरक्षा रक्कमही जमा करावी लागेल.

फक्त एक कोच बुक करण्यासाठी तुम्हाला ५०,००० रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी संपूर्ण ट्रेन बुक करण्यासाठी तुम्हाला ९ लाख रुपये द्यावे लागतील. तुम्ही हे बुकिंग प्रवासाच्या ३० दिवस ते ६ महिने आधी करू शकता. तुमचा फिरायला जाण्याचा प्लॅन रद्द झाल्यास तुम्ही बुकिंग रद्ददेखील करू शकता.