आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस: जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि यंदाची थीम

जागतिक वन्यजीव निधी (WWF) च्या मते जागतिक पातळीवर फक्त ३९०० एवढेचं वाघ शिल्लक आहेत. २० व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच वाघांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली.

International Tiger Day 2021
भारतातील वाघांची संख्या २९६७ एवढी आहे. (Photo: Pixeles)

दरवर्षी २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे. शिकार आणि बेकायदेशीर व्यापार तसेच अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी कमीत कमी केल्यास जंगलांची बचत होईल ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात बचत होईल. म्हणूनच जागरूकता वाढवून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व्याघ्रदिन साजरा करू या आणि भारताच्या राष्ट्रीय प्राण्याला नामशेष होण्यापासून वाचविण्यासाठी ठोस पावले उचलूया.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसाचा इतिहास

जागतिक स्तरावर वाघांची घटती कमी करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र परिषदेत देशांनी २०१०  मध्ये केलेल्या कराराची आठवण म्हणून हा दिवस दरवर्षी २९  जुलै रोजी केला जातो. तसेच प्रतिनिधींनी घोषित केले की सन २०२२ पर्यंत ज्या देशात वाघांची संख्या आहे त्यांनी ती संख्या जवळपास दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करतील.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसाची थीम आणि महत्त्व

आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी “त्यांचे अस्तित्व आमच्या हातात आहे” या घोषणेने किंवा थीमने साजरा केला जातो. वाघाची घटती संख्या आणि जगभरात वाघांचे संवर्धन करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे. जागतिक वन्यजीव निधी (WWF) च्या मते जागतिक पातळीवर फक्त ३९०० एवढेचं वाघ शिल्लक आहेत. २० व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच वाघांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली. याच एक मुख्य कारण शिकार आहे.

भारतातील व्याघ्र संवर्धन

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या वाघाच्या अंदाज अहवालानुसार भारतातील वाघांची संख्या २९६७ एवढी आहे. देशाची जागतिक स्तरावर आतापर्यंतची सर्वाधिक वाघांची संख्या आहे. प्रोजेक्ट टायगरची सुरूवातही १९७३ साली झाली. सध्याच्या परिस्थितीत प्रकल्प टायगर अंतर्गत नियोजित प्रयत्नांमुळे जगातील सर्वाधिक वाघ भारतात आहेत.

वाघांची संख्या कमी होण्याची कारणे

वस्ती कमी होणे – शेती, जमीन, लाकूड यासाठी मानवाने जंगलाचे क्षेत्र तोडले आणि पुरेशी राहण्याची जागा तयार केली. जंगले तोडल्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात ९३% तोटा झाला आहे आणि त्यामुळे त्यांची जगण्याची शक्यता कमी झाली आहे.

शिकार करणे आणि अवैध व्यापार – वाघांची शिकार केली जाते कारण त्याच्या शरीरातील प्रत्येक भागाला  मोठ्या प्रमाणात मागणी असते.

हवामान बदल – सुंदरबनची वाढती समुद्राची पातळी नष्ट होत आहे. रॉयल बंगाल टायगर्सचं हे  सर्वात मोठ निवासस्थान आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: International tiger day 2021 history theme significance ttg