Vi, Jio की Airtel… तिघांपैकी सर्वात स्वस्त आणि मस्त Yearly Plan कोणाचा?; जाणून घ्या किंमत, सेवेबद्दल

रिलायन्स जिओचा हा प्लॅन बाजारात आल्यानंतर जिओ, एअरटेल किंवा व्होडाफोन आयडीया कोणता प्लॅन उत्तम आहे यासंदर्भात अनेकजण तुलना करत आहेत, त्याचनिमित्ताने…

vi jio airtel yearly plan
तिन्ही कंपन्यांनी वार्षिक प्लॅनमध्ये नक्की काय सेवा दिल्यात यासंदर्भातील माहिती…

रिलायन्स जिओ कंपनीने ३ हजार ४९९ रुपयांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनची घोषणा केलीय. कंपनीने फ्रिडम प्लॅन्सच्या नावाखाली १२७ रुपयांपासूनच्या अनलिमिटेड डेटा प्लॅनची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच हा वार्षिक प्लॅनची घोषणा करण्यात आलीय. या नवीन वर्षिक प्लॅनमध्ये दिवसाला ३ जीबी डेटा मोफत मिळणार आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यावर वर्षभरामध्ये एक हजार ९५ जीबी डेटा युझर्सला वापरता येणार आहे. दिवसाचा तीन जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत खाली येईल. विशेष म्हणजे पहिल्यांदाच जिओने अशाप्रकारे दिवसाला तीन जीबी डेटा या हिशोबाने वार्षिक प्लॅन ग्राहकांसाठी बाजारात आणलाय. यापूर्वी दिवसाला ३ जीबी डेटा वापरण्याची मूभा असणारे प्लॅन्स हे २८,५६ आणि ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसहीत यायचे. देशातील सर्व युझर्सला हा वार्षिक डेटा प्लॅन घेता येणार आहे. मात्र आता रिलायन्स जिओचा हा प्लॅन बाजारात आल्यानंतर जिओ, एअरटेल किंवा व्होडाफोन आयडीया कोणता प्लॅन उत्तम आहे यासंदर्भात वापरकर्त्यांमध्ये संभ्रम आहेत. म्हणूनच या तिन्ही कंपन्यांनी वार्षिक प्लॅनमध्ये नक्की काय सेवा दिल्यात यासंदर्भातील हा विशेष लेख…

रिलायन्स जिओच्या वार्षिक रिचार्जमध्ये काय काय आहे पाहुयात

> या रिचार्जची व्हॅलिडिटी ही ३६५ दिवस असेल.

> दिवसाला तीन जीबी डेटा वापरता येणार आहे.

> दिवसाला १०० मोफत मेसेज देण्यात आले आहेत.

> कोणत्याही नेटवर्कवर अन-लिमिटेड व्हॉइस कॉलची सुविधा देण्यात आलीय.

> तसेच हा रिचार्ज केल्यानंतर जिओ सूट अ‍ॅप्सचा लाभ घेता येणार आहे.

> जिओ सूट अ‍ॅप्समध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड, जिओ सिक्युरीटी आणि जिओ न्यूज या सेवांचा समावेश आहे.

> जिओचा हा सर्वात महागडा ३ जीबी डेटा प्लॅन असला तरी तो वर्षभरासाठी आहे. यापूर्वी कंपनीने ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा डेली ३ जीबी फ्री असणाऱ्या प्लॅन ९९९ रुपयांना उपलब्ध करुन दिलेला.

> या रिचार्जची किंमत ३ हजार ४९९ रुपये असेल.

एअरटेलचा प्लॅन काय?

> या रिचार्जची व्हॅलिडिटी ही ३६५ दिवस असेल.

> यामध्ये दिवसाला दोन जीबी डेटा वापरता येणार आहे.

> दिवसाला १०० मोफत मेसेज देण्यात आले आहेत.

> कोणत्याही नेटवर्कवर अन-लिमिटेड व्हॉइस कॉलची सुविधा देण्यात आलीय.

> तसेच यामध्ये एअरटेलच्या एक्सस्ट्रीम प्रिमियर, ओपोलो २४/७ सर्कल, फ्रि हॅलोट्यून्स, फ्री विंक म्युझिकची सेवा देण्यात आलीय.

> फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक ऑफर देण्यात आलीय.

> एअरटेलचा ३६५ दिवसांच्या प्रिपेड प्लॅनची किंमत २ हजार ४९८ रुपये आहे

व्होडाफोन आयडियाचा प्लॅन काय?

 

> या रिचार्जची व्हॅलिडिटी ही ३६५ दिवस असेल.

> व्होडाफोन आयडियाच्या वर्षिक प्लॅनमध्ये दिवसाला १.५ जीबी डेटा मोफत देण्यात आलाय.

> या प्लॅनमध्येही अनलिमिटेड कॉल्सची सेवा देण्यात आलीय.

> दिवसाला १०० मोफत एसएमएस देण्यात आले आहेत.

> तसेच एका वर्षासाठी डिस्ने प्लस हॉटस्टारचं मोफत व्हिआयपी सबक्रिप्शनची सेवा देण्यात आलीय.

> विशेष म्हणजे मध्य रात्रीपासून ते पहाटे सहापर्यंत म्हणजेच १२ एएम ते ६ एएमदरम्यान नेट वापरल्यास ते मोफत डेटामध्ये गृहित धरलं जाणार नाहीय.

> तसेच न वापरलेला डेटा विकेण्डला वापरण्याचाही पर्याय देण्यात आलाय.

> व्होडाफोन आयडियाचा हा प्लॅन २ हजार ५९५ रुपयांना उपलब्ध आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jio launches rs 3499 annual prepaid plan how it compares against airtel and vi scsg