JRD Tata Birth Anniversary: भारतातील पहिले पायलट ते भारत रत्न, जेआरडींचा प्रेरणादायी प्रवास

जे.आर.डी. टाटा यांनी टाटा अँड सन्समध्ये बिनपगारी प्रशिक्षणार्थी म्हणून काम सुरु केले. १२ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आणि समर्पणानंतर ते टाटा अँड सन्सचे अध्यक्ष झाले.

JRD Tata Birth Anniversary
जे.आर.डी.टाटा म्हणजेच जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (Express archive photo)

भारतीय हवाई उड्डाणांचे जनक जे.आर.डी.टाटा म्हणजेच जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा. प्रख्यात बिझनेस टायकून आणि विमानवाहक म्हणून, ते १९२९ मध्ये देशातील प्रथम परवानाधारक पायलट बनले. टाटा अँड सन्सचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ५० वर्षे टाटा समूहाला उत्तम उंची आणि यश मिळवून देण्यासाठी काम केलं. यशस्वी उद्योजक आणि दूरदर्शी, टाटा यांनी समाजाच्या उन्नतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी तयार केलेल्या अनेक योजनांपैकी काही योजना भारत सरकारने स्वीकारल्या आहेत. श्रीमंत देशापेक्षा अधिक सुखी राष्ट्र असा  भारत असावा असं त्यांना वाटत होतं. जाणून घेऊयात त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास.

१. जे.आर.डी.टाटा यांना लष्करी गुणवत्तेसाठी सर्वोच्च पुरस्कार ‘फ्रेंच लिजन ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारत रत्न’नेही सन्मानित करण्यात आले होते.

२. भारतात परतल्यावर जे.आर.डी. टाटा यांनी टाटा अँड सन्समध्ये बिनपगारी प्रशिक्षणार्थी म्हणून काम सुरु केले. १२ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर  आणि समर्पणानंतर ते टाटा अँड सन्सचे अध्यक्ष झाले.

३. जे.आर.डी. टाटा यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला आणि त्यांनी लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केले. अभ्यासानंतर ते फ्रेंच सैन्यात दाखल झाले तिथे त्यांनी एक वर्ष सेवा बजावली.

४.  जे.आर.डी.टाटांना नेहमीच उड्डाण करण्यात रस होता. पायलट लायसन्स मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. तेव्हा ती त्यांची यशाची पहिली पायरी होती. १९३२ मध्ये त्यांनी टाटा एअरलाइन्स बनवली ज्याला आता एअर इंडिया म्हणतात.

५. भारतातील कुटुंब नियोजन चळवळ सुरू करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

६. ते ५० वर्षे डोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त होते. ट्रस्टने आशिया खंडातील पहिले कर्करोग रुग्णालय स्थापन केले. १९४१ मध्ये जे.आर.डी.टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा मेमोरियल सेंटर फॉर कॅन्सर सुरू करण्यात आले.

७. जे.आर.डी.टाटाचे मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे जिनिव्हा येथे निधन झाले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jrd tata birth anniversary lesser known facts about the father of indian aviation ttg