Second Hand Car: नवीन कार घेणे सर्वांनाच परवडेल असे नाही, त्यामुळे अनेक जण सेकंड हँड कार (second hand car) खरेदीला प्राधान्य देत असतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भारतात सेकंड हँड वाहनांचा बाजार चांगलाच तेजीत आलेला दिसून येत आहे. नवीन कारसह सेकंड हँड कारच्या विक्रीमध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सुरक्षेच्या दृष्टीने अनेकांनी स्वत:ची वाहने खरेदी केलीत त्यामुळे हा बाजारदेखील सध्या तेजीत आलेला आहे. आपण बहुतेकदा कार खरेदी करताना काही चुका करतो, नंतर ती लक्षात आल्यावर वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे सेकंड हँड कारची खरेदी करताना कुठल्या चुका टाळाव्यात व कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यावे हे,आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला सेकंड हँड कार खरेदी करताना योग्य निवड करण्यात मदत होईल.

सेकंड हँड कार घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

  • कारचे सर्व पार्ट्स पाहा

सेकंड हँड कार खरेदी करताना कारचे सर्व पार्ट्स तपासून पाहा. मेकॅनिकला देखील ते पाहायला सांगा. कार चालवून पाहा. त्याद्वारे तुम्हाला कळेल की कार चांगल्या कंडीशनमध्ये आहे की नाही. कारचे पार्ट्स जुने किंवा बदलण्याची गरज असेल तर कारची किंमत कमी करायला लावा. जेणेकरून तुम्ही नव्याने ते पार्ट्स खरेदी करून कारमध्ये जोडू शकाल. कारच्या एकंदरीत कंडीशनवरून कारची किंमत ठरवा.

best time to shower morning or night what time of day should you shower heres what doctors recommend read
सकाळ की रात्र; अंघोळीची योग्य वेळ कोणती? डॉक्टर काय सांगतात? वाचा….
Matka Hygiene know the mistakes while drinking matka water or clay pot water
उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा…
how to shave underarm hair know the 5 easy steps to shave armpit
काखेतील केस काढण्यासाठी रेझरचा वापर करताय? मग ‘या’ चार गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा…
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका
  • मायलेज  

अनेकदा जुन्या गाड्यांचा मायलेज कमी झालेला असतो. त्यामुळे कार हायवेवर तसेच खडबडीत रस्त्यावर चालवून मायलेजची माहिती मिळवा. यात फ्रेम, ब्रेकिंग आणि सस्पेंशनही तपासले जाते. कारचे अलाइनमेंट तपासा. गाडीचा कोणताही भाग कोणत्याही बाजूला झुकलेला नसावा याची खात्री करण्यासाठी सपाट जागेवर गाडी उभी करा. 

(आणखी वाचा : स्वस्त आणि दमदार ७ सीटर SUV शोधताय? पुढील वर्षांत लाँच होणार ‘या’ तीन दमदार SUV )

  • मेकॅनिककडून इंजिन तपासून घ्या

सेकेंड हँड वाहन खरेदी करताना वाहनांबद्दल चांगली माहिती असलेल्या मित्राला किंवा एखाद्या मेकॅनिकला सोबत नेणं सर्वात उत्तम ठरू शकतं. त्या मेकॅनिकला संबंधित गाडी, तिचं इंजिन तपासायला लावा. त्याने जर ग्रीन सिग्नल दिला तरच ते वाहन खरेदी करा. त्याने जर कारमध्ये काही दोष असल्याचं सांगितलं तर ते वाहन खरेदी करू नका.

  • टेस्ट ड्राइव्ह

वाहन व्यवस्थित चालवा आणि त्याचे ब्रेक, क्लच, गिअर्स, हॉर्न इत्यादी तपासा. वाहनाची कार्यक्षमता जाणून घेण्यासाठी टेस्ट ड्राइव्ह हा सर्वोत्तम मार्ग आहे. वाहन सुरू करणे, क्लच गियर वापरल्यानंतर वेग वाढवणे आणि न थांबता सुरळीतपणे पुढे जाणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच वाहन कोणत्याही प्रकारचा आवाज करत नाही किंवा चालताना कुठेतरी अडकले आहे किंवा त्यात काही धक्का बसला आहे का याचीही नोंद घ्या. कमी किंवा कमी रहदारी असलेल्या ठिकाणी ४०-५० च्या वेगाने वाहन चालवण्याचा प्रयत्न करा. यावरून तुम्हाला कारच्या स्थितीची कल्पना येईल.

  • गाडीच्या इन्शुरन्सबाबत माहिती घ्या

गाडीच्या इन्शुरन्सबाबत (Car insurance) माहिती घेणेही गरजेचे आहे. सेकंड हँड गाडी विकत घेतल्यानंतर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जुन्या मालकाच्या जागी आपलं नाव नोंदवणं (Car insurance transfer) आवश्यक आहे. गाडी विकत घेताना असं लक्षात आलं, की तिचा इन्शुरन्स केलेला नाही, तर तातडीने इन्शुरन्ससाठी नोंदणी करुन घ्यावी. यासोबतच, गाडीची कागदपत्रं आपल्या नावावर करण्यापूर्वी गाडीची हिस्ट्री (Vehicle history) तपासून घ्यावी. गाडीचा यापूर्वी कधी अपघात झाला आहे का, असल्यास तो कशा प्रकारचा होता या सर्व गोष्टी तपासून घ्याव्यात. यात काही विवादास्पद माहिती आढळून आल्यास अशी गाडी घेणं टाळावं.