फ्रिज ही पूर्वी चैनीची वस्तू होती; पण आता स्वयंपाकघरातील ती अतावश्यक बाब झाली आहे. नुसता फ्रिज बिघडला तरी आता दुधाचं काय होणार? भाज्या कशी टिकतील यासारखे अनेक प्रश्न पडायला लागतात. पण अशा या अत्यावश्यक गोष्टीची काळजी आपण किती घेतो. फ्रिजची काळजी घेणं म्हणजे फ्रिज स्वच्छ ठेवणं. कारण फ्रिजमधे आपण खाद्यपदार्थ, खाण्याशी निगडित आवश्यक बाबी ठेवत असतो. फ्रिज हा आपल्या रोजच्या वापरासाठी कितीही उपयोगी पडला तरीही दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनतर फ्रिजरमध्ये जो बर्फ साचतो तो साफ करणे म्हणजे एक प्रकारची डोकेदुखीच. एखादं भांड ठेवलं किंवा बर्फाचा ट्रे ठेवला तर तो काढताना नाकी नऊ येतात. मात्र आता टेंशन घ्यायचं कारण नाही, आम्ही यासाठी एक भन्नाट जुगाड घेऊन आलो आहोत.
फ्रीजरमध्ये बर्फ साठल्यावर वस्तू निघत नाहीत?
गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. अशाच जुगाडापैकी एक हा फ्रिजमधील तेलाचा जुगाड. यात एका महिलेने फ्रिजमध्ये तेलाचा वापर किती फायदेशीर ठरेल हे सांगितलं आहे. गृहिणीने सांगितल्यानुसार फ्रिजमध्ये तेलाचा वापर हा फ्रिजरमध्ये मोठ्या कामाचा आहे. तुम्ही एखादा पदार्थ भरून ते भांडं फ्रिजरमध्ये ठेवता. याशिवाय बर्फाचा ट्रेही ठेवता. तर या भांड्याला, बर्फाच्या ट्रेच्या तळाशी तेल लावण्याचा सल्ला या गृहिणीने दिला आहे. यासाठी तुम्ही वापर असलेल्या कोणत्याही कुकिंग ऑईलचा वापर करू शकतं. फक्त खोबरेल तेल वापरू नका, कारण ते गोठेल आणि काहीच रिझल्ट येणार नाही.




पाहा व्हिडीओ
हेही वाचा – What ‘Jalebi’ called in English? जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? खूप कमी लोकांना माहिती असेल
फ्रिजरमध्ये वारंवार बर्फ साचू नये यासाठी नेमके उपाय काय ?
आवश्यकतेपेक्षा जास्त वेळा फ्रिजरचा दरवाजा उघडू नका.
फ्रिजच्या दाराला असणारी गॅस्केट नियमितपणे तपासा.
फ्रिजरचा दरवाजा पूर्णपणे बंद झाला आहे याची खात्री करा.
फ्रिजमध्ये फक्त थंड केलेले अन्नपदार्थ ठेवा.
भट्टी, ड्रायर किंवा वॉटर हीटर यांसारख्या उबदार उपकरणांजवळ फ्रिज ठेवू नका.
फ्रिजच्या मागील बाजूस आणि भिंतीच्या दरम्यान जागा सोडा.
फ्रिजर योग्य तापमानावर सेट केल्याची खात्री करा.