सध्या ज्याच्याकडे स्‍मार्टफोन आहे तो प्रत्येकजण बहुतांश आर्थिक व्यवहार डिजीटल करतो. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये Paytm, Google pay आणि Phone pe सारखे अॅप अगदी सामान्य झालेत. पण हा स्मार्टफोन चोरीला गेल्यास काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. तसेच तुमच्या मोबाईलचा दुरुपयोग देखील होऊ शकतो. त्यामुळे सर्वात आधी मोबाईल चोरीला गेल्यास अकाऊंट ब्लॉक करणं गरजेचं आहे. ते कसं करायचं हे काही सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Google Pay account कसं ब्‍लॉक करणार?

१, फोन चोरीला गेल्यास सर्वात आधी Google Pay चा हेल्‍पलाईन नंबर 18004190157 वर कॉल करा.
२. या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्ही तज्ज्ञांसोबत बोलण्याचा पर्याय निवडू शकता. त्यांच्याकडून तुम्हाला अकाउंट बंद करण्याची माहिती मिळेल.
३. अँड्रॉईड फोन वापरणारे आपल्या फोनमधून डेटा ‘रिमोट वाइप’ करु शकतात. जेणेकरुन कुणीही तुमच्या गुगल खात्यापर्यंत पोहचणार नाही.
४. याच प्रकारे iPhone वापरणारे देखील आपला डेटा मिटवू शकतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know what to do if smartphone with paytm google pay phone pe is stolen pbs
First published on: 10-10-2021 at 21:16 IST