LIC WhatsApp Service: व्हॉट्सॲप आता फक्त पर्सनल चॅटसाठीहीच नाही, तर आता बऱ्याच गोष्टीसाठीही त्याचा वापर करता येणार आहे. भारतीय जीवन विमा निगम (Life Insurance Corporation) म्हणजेच एलआयसीने डिजिटल सेवा उपलब्ध करून दिली असून एलआयसीने व्हॉट्सअ‍ॅप सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे आयुर्विम्याशी संबंधित सर्व सेवांचा लाभ घेता येणार आहे. व्हॉट्सॲप सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना ११ सुविधांचा लाभ घरात बसून मिळू शकेल. आता तुम्हाला व्हॉट्सॲपवरूनही एलआयसीची योजना निवडता येणार आहे. अशा परिस्थितीत, ग्राहकांना त्याच्या सुविधेचा फायदा करणे आता सोपे होणार आहे.

एलआयसीच्या अधिकृत निवेदनानुसार, ज्या पाॅलिसीधारकांनी पाॅलीसीची नोंदणी आँनलाईन केलेली आहे, त्यांनाच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी आपली पाॅलिसीची नोंदणी केलेली नाही त्यांनी ती तात्काळ करुन घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या कशा प्रकारे तुम्ही एलआयसी व्हॉट्सॲही सेवा वापरण्यासाठी विमाधारकाला एलआयसी पोर्टलवर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅपवरप सेवेचा लाभ धेऊ शकता. जाणून घ्या प्रक्रिया…

a pineapple seller hairstyle look like a pineapple
तरुणाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी! केली चक्क अननसाची हेअरस्टाईल, अननस विक्रेत्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
new hiring at IGI Aviation Bharti 2024
IGI Aviation recruitment 2024 : कस्टमर सर्व्हिस एजंटसाठी मोठी भरती! पाहा अर्ज प्रक्रिया
jugaad video of Unique car parking
जुगाड असावा तर असा! कार पार्किंगसाठी जागा नव्हती म्हणून लढवली शक्कल, व्हिडीओ एकदा पाहाच…

(हे ही वाचा : BSNL 5G: 5G मध्ये BSNL आता देणार खाजगी कंपन्यांना टक्कर; जाणून घ्या ही सेवा कधी सुरू होणार? )

एलआयसी सेवा व्हॉट्सअ‍ॅपवर कशी कराल सक्रिय?

ही सेवा वापरण्यासाठी विमाधारकाला एलआयसी पोर्टलवर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅपवर ‘Hi’ पाठवावे लागेल. विमाधारक हा मेसेज ८९७६८६२०९० वर पाठवू शकतात. यानंतर विमाधारकाला अनेक प्रकारच्या सेवांचा पर्याय दिला जाईल. ग्राहक किंवा पॉलिसी धारक त्यांच्या आवडीच्या सेवेचा वापर करून रिप्लाय करू शकातात. त्यानंतर पॉलिसीधारकास विनंती केलेल्या सेवेची सर्व माहिती दिली जाईल.

एलआयसी पॉलिसीसाठी कशी कराल नोंदणी?

  • सर्वात आधी एलआयसी इंडियाच्या http://www.licindia.in संकेतस्थळाला भेट द्या.
  • त्यात कस्टमर पोर्टलवर क्लिक करा.
  • जर तुम्ही नवीन सदस्य असाल तर ‘न्यू युजर्स’ वर क्लिक करुन संबंधित माहिती भरा.
  • जर तुमच्याकडे आधीच युजर आयडी आणि पासवर्ड असेल तर त्याप्रमाणे संबंधित माहिती भरा
  • आता ‘बेसिक सर्व्हिसेस’ अंतर्गत ‘अॅड पाॅलिसी’ करुन आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

व्हॉट्सॲपवर कोणत्या सेवा आहेत उपलब्ध ?

प्रीमियम देय
धोरण स्थिती
परवाना सेवा दुवे
कर्ज व्याज देय
बोनस माहिती
कर्ज परतफेड कोटेशन
कर्ज पात्रता कोटेशन
युनिट्सचे युलिप-स्टेटमेंट
प्रीमियम प्रमाणपत्र