lions Don’t Attack People In A Safari Vehicle : रानावनात भटकणारे हिंस्र प्राणी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. माणसांवरही जीवघेणा केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. जंगलात फिरणाऱ्या पर्यटकांची वाघ, सिंह, बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांनी शिकार केल्याचे थरकाप उडवणारे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. पण सफारी पार्क्समध्ये अशाप्रकारच्या घटना घडत क्वचितच घडल्या आहेत. कारण खूप साऱ्या आफ्रिकन देशांमध्ये जंगल सफारी करतान पर्यटक जीपने प्रवासर करतात. ही जीप पूर्णपणे खुली असल्याने जंगलाचा परिसर जवळून पाहता येतो. भारतातही सफारी करताना पर्यटक जीपचा वापर करतात. त्यामुळे भारतातही सफारी पार्कमध्ये प्राण्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याच्या घटना तुलनेनं कमी असतील. पण सिंहासारखा हिंस्र प्राणी जंगल सफारी करताना पर्यटकांवर हल्ला का करत नाही? यामागचं कारण वाचून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.

पर्यटकांना ३६० डिग्री अॅंगलने जंगलातील प्राण्यांना पाहता येतं, कारण…

जंगलात सफारी करताना जीपमधून प्रवास केल्यावर चित्ता, बिबट्या, सिंहासारखे प्राणी जवळ येतात, पण हल्ला करण्याचा प्रयत्न करत नाहीत. अशाप्रकारच्या सफारी वेहिकलमध्ये प्रवास केल्यावर पर्यटकांना ३६० डिग्री अॅंगलने जंगलातील प्राण्यांना पाहता येतं. या जीपला विशिष्ट पद्धतीने डिझाईनही केलेलं असतं. जर एखादी जीप प्राण्यांच्या जवळ आली, त्यावेळी प्राणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत नाहीत. हत्तीसारखा मोठा प्राणी जीपवर हल्ला करू शकतो. पण जेव्हा पर्यटक जीपमध्ये बसलेले असतात, तेव्हा सिंहासारख्या प्राण्यांना हे सफारी वेहिकल एखाद्या मोठ्या प्राण्यासारखे वाटतात. त्यामुळे सिंह, वाघासारखे प्राणी हल्ला करत नाहीत. मात्र, पर्यटकांनी जीपबाहेर जाण्याचा किंवा त्या प्राण्यांना चिडवण्याचा प्रयत्न केला, तर हिंस्र प्राणी जीवघेणा हल्ला करु शकतात.

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : भरकटलेल्या युद्धांचा पोरखेळ ..

नक्की वाचा – ‘हा’ आहे जगातील सर्वात लांबचा विमान प्रवास, भारतातील या ठिकाणाच्या नावाचाही समावेश

नॅशनल पार्कमध्ये जंगल सफारी करत असताना प्राणी पिसाळलेले दिसत नाहीत. कारण तेथील अधिकाऱ्यांनी प्राण्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी उपाययोजना केलेल्या असतात. ते नेहमी सफारी वेहिकल प्राण्यांचा जवळ नेतात, कारण प्राण्यांची हालचाल आणि त्यांचे इशारे ओळखण्याचा हे अधिकारी प्रयत्न करतात. काही वेळेला प्राणी हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतात. पण जीपमध्ये असल्यावर ते शिकार करण्याचा प्रयत्न करत नाहीत. कारण जीपचा आकार प्राण्यांपेक्षा मोठा असतो. त्यामुळे वाघ, सिंहासारखे प्राणी अशा वाहनांवर हल्ला करत नाहीत. कारण सफारी वेहिकल मोठ्या आकाराचे असल्याने प्राण्यांना दुखापत होण्याची शक्यता असते.पण एखादा व्यक्ती जीपमधून बारेह गेला, तर हे प्राणी जीवघेणा हल्ला करु शकतात. जर हत्ती, गेंड्यासारखा प्राणी दिसला, तर जीपला वेगानं चालवून त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून ते हल्ला करणार नाहीत.

(बातमीत दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता हे सत्य असल्याचा दावा करत नाही.)