Mukesh Ambani Chef Salary Monthly: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक अशा मुकेश अंबानी यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून भलेभले थक्क होतील. तुम्हीही आजवर अनेकांना आपल्या श्रीमंतीची तुलना मी काय अंबानी नाही/ आहे अशा शब्दात करताना ऐकले असेल. पण तुम्हाला माहित आहे का फक्त अंबानीच नव्हे तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगारही अवाढव्य आहेत. आज आपण मुकेश अंबानी यांच्यासाठी काम करणाऱ्या शेफचा पगार व त्याची कामे पाहणार आहोत. कदाचित आपल्याला माहीत असेल की, मुकेश अंबानी हे शाकाहारी आहेत. स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये १९७० च्या काळात त्यांनी शाकाहारी राहण्याचा निर्णय घेतला. ते अंड्यांचे सेवन करतात पण कोणत्याही प्रकारचे मांस किंवा अल्कोहोलयुक्त पेये घेत नाही. मुकेश अंबानी यांचे आवडते पदार्थ अगदी आपल्यासारखेच आहेत. त्यांना डाळ, चपाती आणि भात खायला आवडते. खाण्याबाबत त्यांनी कोणतेही कठोर नियम ठेवलेले नाही मग ते रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर असो किंवा उच्च दर्जाच्या कॅफेमध्ये असो त्यांना उत्तम चवीचे खाणे आवडते. मुकेश अंबानी यांना खायला काय आवडतं? (Mukesh Ambani Favorite Food) मुकेश अंबानींना थाय फूडची आवड आहे. तर रविवारच्या ब्रेकफास्टसाठी त्यांना इडली-सांभार खाणे प्रचंड आवडते. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनीही सांगितले की, व्यस्त वेळापत्रक असूनही ते नेहमी त्यांच्या कुटुंबासह जेवण करतात.आता या आवडी-निवडी पूर्ण करणाऱ्या शेफच्या कामाची रूपरेषा व त्याबदल्यात मिळणारा मोबदला जाणून घेऊया.. २०१७ मध्ये मुकेश अंबानी यांनी सोशल मीडिया व्हिडिओमध्ये आपल्या ड्रायव्हरचे मासिक वेतन सांगितले होते, त्यानुसार त्यांच्या ड्रायव्हरचा वार्षिक पगार हा २४ लाख म्हणेजच महिन्याला २ लाख इतका होता. आता, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की अंबानी कुटुंबाचे खाजगी निवासस्थान असलेल्या अँटिलिया येथील शेफला देखील महिन्याला २ लाख पगार दिला जातो. हे ही वाचा<< सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा महिन्याचा पगार पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त; कोणत्या सुविधा मिळतात पाहा अहवालानुसार, अँटिलियामधील प्रत्येक कर्मचारी जवळपास समान रक्कम कमावतो. मासिक पगारासह, अंबानीच्या कर्मचाऱ्यांना विमा आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिले जातात. मुकेश अंबानीच्या काही कर्मचारी सदस्यांची मुले अमेरिकेत शाळेत जातात. तुम्हाला आठवत असेल अलीकडेच ६६% वाढ मिळाल्यानंतर, दिल्लीचे आमदार दरमहा ९०,००० कमावतील असे समजत होते. जर तुलनाच केली तर मग मुकेश अंबानीचा शेफ भारतातील बहुतेक आमदारांपेक्षा जास्त कमावतो असे म्हणता येईल.