Munshi Premchand’s Birth Anniversary | नामवंत भारतीय लेखक प्रेमचंद यांच्या ‘या’ आहेत प्रसिद्ध कादंबऱ्या

आपल्यापैकी बहुतेकांनी मुन्शी प्रेमचंद यांची पुस्तकं विशेषतः शाळा आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वाचली आहेत. वाचकांना भुरळ पाडणाऱ्या महान भारतीय लेखक मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या कोणकोणत्या आहेत?

Munshi Premchands Birth Anniversary Great Indian writer Premchands this famous novels gst 97
मुन्शी प्रेमचंद यांनी एकूण डझनभर कादंबऱ्या, ३०० लघुकथा आणि असंख्य निबंध लिहिले. प्रेमचंद यांच्या कादंबऱ्यांवरून अनेक चित्रपट आणि मालिका देखील बनल्या. (Photo : JanSatta)

मुन्शी प्रेमचंद हे भारतातील नामवंत लेखकांपैकी एक आहेत. मुन्शी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्ताने आज आपण त्यांच्या प्रसिद्ध साहित्याविषयी जाणून घेणार आहोत. मुन्शी प्रेमचंद यांच्या साहित्याने वाचकांच्या काळजाला हात घातला. कारण, प्रेमचंद यांच्या कथा या सर्वसामान्यांच्याच कथा होत्या. आपल्या कथांमधून त्यांनी सर्वसामान्यांचे जीवन, वंचित आणि शोषितांची समाजातली दुरावस्था ह्यावर लेखणीतून प्रकाश टाकला. मुन्शी प्रेमचंद यांच्या साहित्याची, कथांची जादू आजही त्यांच्या वाचकांच्या मनावर कायम आणि अजरामर आहे. त्याची पुस्तकं आजही बेस्टसेलर्स आहेत. आपल्यापैकी बहुतेकांनी मुन्शी प्रेमचंद यांची पुस्तकं विशेषतः शाळा आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वाचली आहेत. वाचकांना भुरळ पाडणाऱ्या महान भारतीय लेखक मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या कोणकोणत्या आहेत? घेऊया

मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या

 • गोदान – मुन्शी प्रेमचंद यांची आंतरराष्ट्रीय स्तराची कादंबरी असलेली ‘गोदान’ ही अनेक भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली आहे. ‘द गिफ्ट ऑफ काऊ’ ही या कादंबरीची इंग्रजी आवृत्ती आहे. १९३६ मध्ये प्रकाशित झालेल्या गोदानमध्ये जातीव्यवस्थेतील दोष आणि भारतातील एका लहानशा खेड्यात राहणा-या गरीबांचं शोषण या गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 • निर्मला – जवळपास आपल्या वडिलांच्या वयाच्या एका विधुराशी लग्न करण्यास भाग पडलेल्या एका तरुणी भोवती ही कथा फिरते. १९७२ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीत हुंड्याविषयी आणि सामाजिक सुधारणांच्या गरजांविषयी भाष्य करण्यात आलं आहे.
 • गबन – मुन्शी प्रेमचंद यांनी १९३१ मध्ये लिहिलेली गबन ही कादंबरी नैतिक मूल्ये आणि भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळातील तरुणांशी संबंधित आहे.

याशिवाय कर्मभूमी, मानसरोवर, ईदगाह, बडे घर की बेटी, सेवा सदन आणि प्रेमाश्रम या देखील मुन्शी प्रेमचंद यांच्या आणखी काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. मुन्शी प्रेमचंद यांनी एकूण जवळपास डझनभर कादंबऱ्या, ३०० लघुकथा आणि असंख्य निबंध लिहिले आहेत. मुन्शी प्रेमचंद यांच्या कादंबऱ्यांवरून अनेक चित्रपट आणि मालिका देखील बनल्या. त्या कोणत्या? जाणून घेऊया

मुन्शी प्रेमचंद यांच्या कादंबऱ्यांआधारित चित्रपट आणि मालिका

 • गोदान या कादंबरीवर आधारित ६ भागांची टीव्ही मालिका
 • पंच परमेश्वर – १९९५
 • सद्गती – १९८१
 • गोधुली – १९७७
 • ओका ओरी कथा – १९७७
 • शतरंज के खिलारी – १९७७
 • गॅबन – १९६६
 • हीरा मोती – १९५९
 • सेवा सदन – १९३८
 • मजदूर – १९३४

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Munshi premchands birth anniversary great indian writer premchands this famous novels gst