Mysterious Valley: जग अनेक रहस्यमय गोष्टी आणि ठिकाणांनी भरलेले आहे, ज्यांचे रहस्य आजपर्यंत उघड झाले नाही. यामधील अनेक रहस्य अशी देखील आहेत जी शोधणे विज्ञानासाठीही मोठे आव्हान आहे. आज आपण अशाच एका रहस्यमय गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत, जे आजपर्यंत कोणीही शोधू शकले नाही. खरं तर, आम्ही एका अशा दरीबद्दल बोलत आहोत, जी आजपर्यंत कोणालाही सापडलेली नाही. ही दरी भारत आणि चीनच्या सीमेवर आहे. असे म्हटले जाते की ही रिलेशन व्हॅली विश्वाच्या इतर कोणत्यातरी जगाशी संबंधित आहे. या रहस्यमय दरीबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ही’ दरी आजपर्यंत कोणीही शोधू शकते नाहीत

एका रिपोर्टनुसार ही दरी अरुणाचल प्रदेश आणि तिबेटच्या सीमेवर कुठेतरी आहे. या दरीला ‘शांगरी-ला व्हॅली’ म्हणतात. ही रहस्यमय दरी वातावरणाच्या चौथ्या परिमाणात म्हणजेच काळाने प्रभावित झालेल्या ठिकाणात गणली जाते. असं म्हटलं जातं की,’शांगरी-ला व्हॅली’चा संबध इतर दुसऱ्या जगाशी आहे. असे मानले जाते की, याठिकाणी वेळ थांबते आणि लोकं हवं तितकं जगू शकतात. ही दरी शोधण्यासाठी जगभरातून अनेकांनी प्रयत्न केले, पण आजपर्यंत कोणालाही यश मिळालेले नाही.

‘ही’ दरी बर्म्युडा ट्रँगलइतकीच रहस्यमय आहे

ज्याप्रकारे बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य अनेक दशके कुणाला समजले नाही त्याचप्रमाणे हे जगातील सर्वात रहस्यमय ठिकाण मानले जाते. बर्म्युडा ट्रँगल हे उत्तर अटलांटिक महासागरातील एक ठिकाण आहे, जिथे जाणारी विमाने आणि जहाजे गायब होतात. साहित्यिक अरुण शर्मा यांच्या ‘द मिस्ट्रियस व्हॅली ऑफ तिबेट’ या पुस्तकातही याचा उल्लेख आहे. लेखक सांगतात की एका लामाने त्यांना सांगितले की शांग्री-ला व्हॅलीमध्ये काळाचा प्रभाव नगण्य आहे.

तिबेटी भाषेत लिहिलेल्या ‘काल विज्ञान’ या पुस्तकातही या दरीचा उल्लेख आहे. तिबेटी विद्वान असलेले युत्सुंग म्हणतात की ते स्वतः या रहस्यमय दरीत गेले आहेत. त्यांच्या मते या दरीत ना सूर्यप्रकाश होता ना चंद्राचा प्रकाश, पण तरीही या रहस्यमय दरीत प्रकाश सगळीकडे पसरला होता.

( हे ही वाचा: ‘या’ देशात एकही साप आढळत नाही; यामागचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल)

दरीचा शोध घेणारे हरवले..

शांग्री-ला व्हॅली हे पृथ्वीचे आध्यात्मिक नियंत्रण केंद्र म्हणूनही ओळखले जाते. त्याच वेळी, याला सिद्धाश्रम देखील म्हणतात, ज्याचा उल्लेख महाभारतापासून वाल्मिकी रामायण आणि वेदांपर्यंत हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये केला गेला आहे. या रहस्यमय दरीचा शोध घेण्यासाठी चिनी सैन्यानेही खूप प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळू शकले नाही. अनेक अहवाल सांगतात की जगातील शांग्री-ला व्हॅलीचे रहस्य उलगडण्याचा ज्या लोकांनी प्रयत्न केला ते पुन्हा सापडलेचं नाहीत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mysterious shangri la valley whoever went to this never came back know intresting facts gps
First published on: 01-02-2023 at 12:23 IST