आधार कार्ड हे सध्या सर्वात महत्वाचे कागदपत्रे झाले आहे. बँक खाते असू द्या, की पहिला गॅस सिलिंडरचे घ्यायचे असू द्या, यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. तुमचं आधार कार्ड हे तुमचा मोबाईल नंबर, बँक खाते, पॅन कार्ड आणि इतर अनेक कागदपत्रांशी जोडलेलं आहे. आधार कार्ड हे १२ अंकी युनिक नंबरसह येतो, जो UIDAI द्वारे जारी केला जातो. आधार कार्ड धारकासाठी १२ अंकी क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. तुमची सर्व वैयक्तिक माहिती त्यात दडलेली असते. पण तुम्ही १२ अंकी आधार कार्ड नंबर वापरून तुमच्या बँक खात्यात किती शिल्लक पैसे आहेत हे तपासू शकता. आधारच्या मदतीने अशा काही सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बँकेत जाण्याची गरज भासणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंटरनेट बँकिंगशिवाय तपासता येणार खात्यातील शिल्लक रक्कम

तुम्ही इंटरनेट बँकिंगशिवाय तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याचीही गरज भासणार नाही. यासाठी तुमच्याकडे फक्त मोबाईल असणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून आधारच्या मदतीने तुमच्या बँक खात्यात जमा केलेल्या रकमेचा तपशील सहज जाणून घेऊ शकता. तुमच्या आधार कार्डच्या मदतीने बँक तपशील तपासण्यासाठी, तुमचे बँक खाते UIDAI द्वारे प्रदान केलेल्या १२ अंकी अद्वितीय क्रमांकासह जोडलेले असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी जोडलेला असावा.

(आणखी वाचा : जाम भारी! WhatsAppवर येणार नवीन फीचर; आता मजा येणार दुप्पट, पाहा काय आहे खास )

शिल्लक तपासण्याची प्रक्रिया

-सर्वप्रथम बँक खात्यात नोंदणीकृत तुमच्या मोबाईल नंबरवरून ९९९९*१# डायल करा.
-आता १२ अंकी आधार क्रमांक टाका.
-त्यानंतर तुमचा आधार क्रमांक पुन्हा टाकून पडताळणी करा.
-तुम्हाला UIDAI कडून स्क्रीनवर बँक बॅलन्ससह एक फ्लॅश एसएमएस पाठवला जाईल

तुम्ही ‘या’ सुविधांचाही लाभ घेऊ शकता

आधारच्या मदतीनं तुम्ही पैसेही पाठवू शकता, सरकारी अनुदानासाठी अर्ज करू शकता किंवा आधार कार्डच्या मदतीनं पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता आणि आधार केंद्राला भेट देऊन आधारमधून पैसे काढू शकता.UIDAI नं अलीकडेच म्हटलं आहे की, तुमचा फोन नंबर आधारशी लिंक करणं, इतर तपशील अद्ययावत करणं इत्यादी घरोघरी सेवा पुरवण्याची योजना आखत आहे. या सेवेमुळे लोकांना आधार सेवेकडे जाण्याची गरज भासणार नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now check your bank account balance in minutes with aadhaar card follow these easy steps pdb
First published on: 23-11-2022 at 12:49 IST