कितीही नाही म्हंटलं तरी आजही आपल्याकडे चारचाकीला पांढरा हत्ती म्हणूनच संबोधले जाते. सध्या कार घेणाऱ्यांचं प्रमाण जरी वाढलं असलं तरी ती आजही एक चैनीची गोष्टच आहे. कितीही स्वस्त वाटत असली तरी कार घेणं हा आजही मध्यमवर्गीय कुटुंबात हा एक सण म्हणून साजरा करण्यात येतो. सध्याच्या बऱ्याचशा सेडान आणि एसयुव्ही गाड्यांमध्ये एक गोष्ट आपल्याला हमखास बघायला मिळते ती म्हणजे ‘सनरूफ’. गाडीच्या छतावर एक बंद होणारी आडवी खिडकी जिला सनरूफ म्हणतात. आजकाल बऱ्याच प्रीमियम गाड्यांमध्ये सनरूफ हे असतंच.

‘वेक अप सिड’ या चित्रपटात मुंबईच्या रस्त्यांवर रात्री त्या सनरूफमधून बाहेर येऊन मोकळ्या हवेचा आनंद घेणारा रणबीर कपूर आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. बऱ्याच बॉलिवूड चित्रपटात असा एखादा सीन तरी आपल्याला पाहायला मिळतोच. याच गोष्टीचं अनुकरण सध्या आपण बऱ्याचदा बघतो. मोठ्या माणसांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येकालाच त्या सनरूफमधून डोकं बाहेर काढून मोकळ्या हवेचा आनंद घ्यायचा मोह आवरत नाही. बऱ्याचदा काही तरुण मुलं केवळ स्टाइल स्टेटमेंटसाठी असं करतात. सध्या आपल्या शहरातील रस्त्यांवर तुम्हाला हे चित्र दिसणं अगदीच कॉमन झालं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का हा काही क्षणांचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला हजारो रुपयांचा दंड भरावा लागू शकतो?

health benefits of lauki
तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How To Avoid White Clothes Getting Stain Of Color Dresses
Video: कपडे धुताना ‘हा’ पांढरा खडा वापरून वाचवा पैसे; बादलीत एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागणारच नाही
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

आणखी वाचा : भारताच्या ‘या’ राज्यात आहे असा एक पूल ज्याची खोली आजपर्यंत कोणीही शोधू शकला नाही..

भारतात चालत्या गाडीच्या सनरूफमधून डोकं बाहेर काढून उभं राहणं बेकायदेशीर आहे आणि यासाठी तुम्हाला दंडदेखील भरावा लागू शकतो. शिवाय अपघात झाल्यास त्या व्यक्तीला गंभीर दुखापत होऊ शकते यासाठी मोटर वेहिकल अॅक्टमध्ये या कायद्याची तरतूद केली आहे. गेल्याच वर्षी असं करणाऱ्या व्यक्तीला थेट १००० रुपयांचा दंड लावण्यास कलकत्ता ट्रॅफिक पोलिसांनी सुरुवात केली आहे. कलकत्तामध्ये बऱ्याच ठिकाणी हे अनुभव आल्याने आणि काही ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्षात आल्याने यावर ते आता कडक कारवाई करत आहेत. तसंच लोकांमध्ये याविषयी जनजागृती करण्यासाठीसुद्धा ते प्रयत्न करत आहेत.

शिवाय काही वाहन चलकांना गाडी चालवताना पटकन समोर येणारी एखादी वायर किंवा कोणतीही लटकणारी वस्तु दिसत नाही तेव्हा सनरूफमधून डोकं बाहेर काढून मोकळ्या हवेचा आनंद घेणाऱ्या व्यक्तीसाठी ते धोकादायक ठरू शकतं. सनरूफचे विविध प्रकार आहेत आणि त्याचा उद्देश वेगळाच आहे हे कुणालाच फारसं ठाऊक नाही.

गाडीला सनरूफ देण्याचा उद्देश काय?

परदेशात सनरूफचा वापर थंडीमध्ये प्रवास करताना होतो. तिथल्या लोकांचा थेट ऊन्हाशी संबंध कमी येत असल्याने तिथे प्रवास करताना सनरूफ मधून येणारा थोडा सूर्यप्रकाशही महत्त्वाचा असतो आणि प्रवास करताना त्यामुळे थोडं बरं वाटावं यासाठी सनरूफची सोय करून दिलेली असते. ९० च्या दशकाच्या शेवटी भारतीय गाड्यांमध्ये हा प्रकार फार दिसायला लागला. त्याआधी सनरूफ हे फक्त मर्सिडिज, बीएमडब्लु, स्कोडा अशा लक्झरी गाड्यांमध्येच दिले जायचे. आता ती गोष्ट खूप सर्रास झाली आहे.

आणखी वाचा : भारतात ‘हा’ आहे सर्वात लहान रेल्वे मार्ग; अवघ्या ९ मिनिटांत संपतो प्रवास..

शिवाय भारतातील गाड्यांमध्ये सनरूफ देण्यामागील कारणही वेगळं आहे. भारतातील तापमान बघता आपली गाडी आपण अर्ध्यातासाहून अधिक काळ जरी बंद ठेवली तरी त्यात नंतर बसल्यावर कोंदटपणा जाणवतो. तीच समस्या दूर करण्यासाठी भारतीय गाड्यांमध्ये सनरूफ देण्यात आले आहे. जेणेकरून गाडी बसल्यावर बाहेरच्या हवेमुळे आपल्याला थोड्याच वेळात फ्रेश वाटू लागते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की काही क्षणांच्या आनंदासाठी आपण त्या सनरूफमधून डोकं बाहेर काढतो, पण तसं केलं तर आपल्यालाच दंड भरावा लागतो आणि ती काही क्षणांची मजा आपल्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे यापुढे सनरूफमधून डोकावताना याचा विचार नक्की करा!