Animal Have Heart in Head : हृदय हा प्रत्येकाच्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. मानवी शरीरात हृदय हे छातीमध्ये डाव्या बाजूला असते. सहसा प्राण्यांचे हृदयसुद्धा छातीत असते, पण तुम्हाला एक असा प्राणी माहिती आहे का ज्याचे हृदय छातीत नाही तर चक्क डोक्यामध्ये आहे. होय, आज आपण त्याच प्राण्याविषयी जाणून घेणार आहोत.

स्क्विड्स (माकुल) हा एक असा प्राणी आहे ज्याचे हृदय चक्क त्याच्या डोक्यामध्ये आहे. स्क्विड्सला इतर सेफॅलोपॉड्सप्रमाणे (माशांचा प्रकार), एक अनोखी शरीर रचना असते. त्याच्या डोक्यामध्ये हृदय असते. डोक्यामध्ये हृदय असल्याने स्क्विड्स इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो.

animals that experience menopause
निसर्गाची किमया! तुम्हाला माहितीये का; मानवाव्यतिरिक्त ‘या’ ५ प्राण्यांनाही येतो मेनोपॉज!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Animals Can swallow humans
मनुष्यांना गिळंकृत करू शकतात ‘हे’ ४ भयानक प्राणी; घ्या जाणून…
Tigress falls into well while chasing wild boar
Video : रानडुकराचा पाठलाग करताना वाघीण पडली विहिरीत…
Tiger cub and wild boar fall into same well after chase goes wrong in MadhyaPradesh's Seoni shocking video
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा” वाघावर काय वेळ आली पाहाच; VIDEO व्हायरल
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Dog Winter Clothes
तुमच्या पाळीव प्राण्याला थंडीचा सामना करण्यासाठी स्वेटर घालणे गरजेचे आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांची मते…
vasai virar, dead animals
वसई विरार मध्ये मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी दफनभूमी, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावास मंजुरी

स्क्विड्सला एक नाही तर तीन हृदय असतात.

स्क्विड्सला मुळात तीन हृदय असतात. दोन हृदय (ब्रांचियल हार्ट) आहेत, जी स्क्विडच्या श्वसन अवयवामध्ये रक्तपुरवठा करतात, तर तिसरे हृदय हे स्क्विडच्या उर्वरित शरीरात रक्तपुरवठा करते.
स्क्विड्सच्या डोक्यामध्ये मेंदू आणि हृदय दोन्ही असते. मेंदूजवळील हृदय हे त्याच्या मेंदूला आणि डोळ्यांना ऑक्सिजनचा सतत पुरवठा करते, जे त्याच्या जगण्यासाठी आवश्यक असते.

स्क्विड्सची चयापचय क्रिया चांगली आहे, ज्यासाठी भरपूर ऑक्सिजन आवश्यक आहे. त्यामुळे स्क्विड्सची अनोखी हृदय रचना शरीराची मागणी पूर्ण करते.स्क्विड्स खूप वेगाने पोहतात आणि त्यांचे मजबूत हृदय त्यांच्या स्नायूंना रक्त पुरवण्यास मदत करतात, ज्यामुळे त्यांना पाण्यातून वेगाने पोहता येते.

स्क्विड्सचा मेंदू त्यांच्या शरीराच्या आकाराच्या तुलनेने मोठा असतो. स्क्विड्स त्यांच्या गुंतागुतीच्या (complex) वर्तनामुळे ओळखले जातात. स्क्विड्स परस्पर संवाद साधतात आणि समस्या सोडवतात. त्यांची ही अनोखी हृदय रचना त्यांच्या वर्तनाला सहकार्य करते. स्क्विड्सच्या अनोख्या हृदयाच्या रचनेने त्यांचे राहणीमान सुधारू शकते, ज्यामुळे त्यांना त्यांचे आयुष्य अधिक सोयीस्कररित्या जगता येऊ शकते.

Story img Loader