scorecardresearch

Premium

२१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस का असतो? काय आहे कारण?

२१ जून हा दिवस सर्वात मोठा असण्यामागचं कारण पृथ्वी आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

longest day on Earth 21 June
२१ जून हा दिवस सर्वात मोठा का असतो ठाऊक आहे?

Summer Solstice 2023 longest day of year: २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र याच दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे २१ जून म्हणजेच आजचा दिवस हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. आता २१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस का? असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल. याचं कारण आहे आपली पृथ्वी. नेमकं काय घडतं आज? की वर्षभरातला हा सर्वात मोठा दिवस असतो. चला जाणून घेऊ.

२१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस का?

पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे आजचा दिवस हा वर्षातल्या इतर दिवसांच्या तुलनेत सर्वात मोठा दिवस असतो. आज पृथ्वीला २४ तासांपैकी सामान्यतः १३ तासांहून अधिक काळ पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास लागतो. त्यामुळे आज सरासरी १३ तासांहून मोठा दिवस असतो. तर १० तास आणि काही मिनिटांची रात्र असते. उत्तरायण संपून दक्षिणायनही आजच सुरु होतं.

pink lake burlinskoye in siberia
चक्क गुलाबी रंगाचे पाणी आहे ‘या’ रहस्यमयी तलावात; सुंदरता पाहण्यासाठी पर्यटकांची होते गर्दी; पाहा व्हायरल व्हिडीओ
Women Giving Birth to 9 Babies Reality Video Huge Belly With 40 Kg Muscles Due To Overian Cancer Liver Issue Sad Facts Viral
४० किलोचं पोट, ९ बाळं, २ वर्षं.. ‘या’ महिलेच्या कहाणीने पाणावतील डोळे; नेमकं खरं घडलं काय?
age of 65 are at highest risk of dementia
६५ वर्षांवरील लोकांना स्मृतिभ्रंशाचा सर्वाधिक धोका
iPhone 15 Launch Live Streaming Details in Marathi
iPhone 15 Launch Live Streaming: आज लॉन्च होणार आयफोन १५ सिरीज; कुठे पाहता येणार लाइव्ह इव्हेंट? जाणून घ्या

२१ जून हा सर्वात मोठा दिवस असला तरी प्रत्येक देशात किती तास सूर्यप्रकाश असणार याची गणितं वेगळी असतात. काही ठिकाणी १३ तासांहूनही अधिक काळ सूर्यप्रकाश असतो. या दिवसाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, याच दिवसापासून दक्षिण गोलार्धातील बऱ्याच देशांमध्ये हिवाळ्याची सुरुवात होते.नासाने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी सूर्यापासून सर्वाधिक उर्जा मिळते, जी ३० टक्के अधिक असते. उत्तर गोलार्धात २०, २१, २२ जून रोजी सर्वाधिक उर्जा मिळते. तर दक्षिण गोलार्धात २१, २२, २३ डिसेंबर रोजी सूर्यापासून सर्वाधिक उर्जा मिळते.

२२ जून १९७५ ला होता मोठा दिवस एरवी ही तारीख २१ जूनच

२१ जून रोजी सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असतो. त्यामुळे पृथ्वीचा उत्तर ध्रुव हा २१ जूनच्या दिवशी सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कोनामध्ये कललेला असतो. यादिवशी सूर्य कर्कवृत्तात थेट डोक्यावर येतो आणि यामुळेच पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक प्रकाश पडतो. त्यामुळे आजच्या दिवशी उत्तर गोलार्धात असणाऱ्या सर्वच देशांमध्ये आजच्या दिवशी दिवस सर्वात मोठा आणि रात्र सर्वात लहान असते. आतापर्यंत फक्त एकदा म्हणजेच २२ जून १९७५ ला सर्वात मोठा दिवस नोंदवला गेला होता. आज घडणाऱ्या या खगोलीय प्रक्रियेला Summer Solstice असं म्हटलं जातं.

Summer Solstice म्हणजे नेमकं काय?

समर सोलस्टिस ही एक खगोलीय प्रक्रिया. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोज येणारा दिवस आणि रोज येणारी रात्र यांचा कालावधी वेगवेगळा असतो. २१ जूनच्या दिवशी पृथ्वी सूर्यासमोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते ज्यामुळे या दिवशी पृथ्वीवर सर्वाधिक सूर्यप्रकाश पडतो. जगातल्या अनेक देशांमध्येही आज १२ तासांपेक्षा मोठा दिवस असतो. २१ जून हा दिवस ऋतू बदलाचा दिवसही मानला जातो. मराठी पंचागांतही २१ जूनची नोंद वर्षा ऋतू प्रारंभ अशी केलेली मिळते. पाश्चिमात्य देशांमध्ये २१ जूनच्या दिवशी Spring म्हणजेच वसंत ऋतू संपतो आणि Summer म्हणजेच उन्हाळा सुरु असतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Summer solstice longest day on earth 21 june do you know the reason behind it scj

First published on: 21-06-2023 at 07:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×