Chief Justice Of India D Y Chandrachud Salary : धनंजय यशवंत चंद्रचूड हे भारताचे ५० वे सरन्यायाधीश आहेत. मागील काही काळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या खटल्यासंदर्भात चंद्रचूड यांचे नाव वारंवार चर्चेत आले आहे. सुनावणीदरम्यान चंद्रचूड यांच्या रोखठोक व मिश्कील अशा दोन्ही बाजू सर्वसामान्यांनादेखील भावल्या आहेत. अलीकडेच चंद्रचूड यांनी न्यायाधीशांच्या कामांचा आणि सुट्ट्यांचा हिशेब मांडला होता. न्यायाधीश वर्षातले २०० दिवस न्यायालयात काम करतात. ते सुट्टीवर असले तरी त्यांच्या डोक्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, कायदे आणि नियम हेच सगळे सुरू असते, असेही चंद्रचूड म्हणाले. देशातील सर्वोच्च पदांपैकी एक भूषविणाऱ्या भारतीय सरन्यायाधीशांना पगार किती मिळतो हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊ या…

डी वाय चंद्रचूड यांचा महिन्याचा पगार किती? (CJI D Y Chandrachud Salary)

देशाचे सरन्यायाधीश हे पंतप्रधानांपेक्षाही अधिक पगार घेतात. न्याय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार सरन्यायाधीशांना महिन्याला २ लाख ८० हजार इतका पगार मिळतो. हा आकडा देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व राज्यपाल यांच्यानंतर सर्वाधिक आहे. तसेच त्यांना पाहुणचारासाठी मासिक ४५ हजार रुपये वेगळे दिले जातात.

The nine judge bench of the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?
supreme court
नुकसानभरपाईच्या पुनरावलोकनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; हवाई दल अधिकाऱ्याला एचआयव्ही संसर्ग
D Y Chandrachud News in Marathi
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयांच्या ‘या’ कृतीवर व्यक्त केली चिंता; म्हणाले, “जे खटले १० महिन्यांपेक्षा जास्त…”
chief justice dy chandrachud
‘मी व्हिस्कीचा चाहता’, सर्वोच्च न्यायालयात वकिलांनी असं म्हटल्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पगाराशिवाय अन्यही अनेक सुविधा दिल्या जातात. त्यांना राहण्यासाठी घर, कार, कर्मचारी, सुरक्षारक्षक, वीज व फोनचे बिल अशा सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. तसेच निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांना वर्षाला १६ लाख ८० हजार पेन्शन दिले जाते.

हेही वाचा<< एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या पगाराचा आकडा ऐकून व्हाल थक्क; आमदारांना तर महिन्याला…

सर्वोच्च न्यायालयातील व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा पगार किती? (Supreme &High Court Judges Salary)

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह अन्यही न्यायाधीश कार्यरत असतात. त्यांचा पगार हा तुलनेने कमी आहे. प्राप्त माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांना महिन्याला २ लाख ५० हजारांपर्यंत पगार दिला जातो. यासह घर, सुरक्षा व्यवस्था व अन्य सुविधासुद्धा दिल्या जातात. निवृत्तीनंतर पदानुसार १३ लाख ५० हजारांपासून ते १५ लाखांपर्यंत पेन्शन दिले जाते. देशातील सर्व राज्यांच्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांनासुद्धा समान पगार व सुविधा दिल्या जातात.