scorecardresearch

सोनं खरेदी करताय? भारतातील ‘या’ शहरांमध्ये मिळतं सर्वात स्वस्त सोनं, नाव ऐकून हैराण व्हाल!

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे. तुम्हालाही बाजारभावापेक्षा स्वस्तात सोने खरेदी करायचे असेल, तर देशातील ‘या’ शहरात सर्वात स्वस्त सोनं विकलं जातय…

Cheapest For Buying Gold In India
‘या’ ठिकाणी मिळतं सर्वात स्वस्त सोनं (Photo-indianexpress)

Cheapest Price for Gold in India: सोनं ही एक धातू आहे जी जगातील जवळजवळ प्रत्येक देश संचयित करू इच्छित आहे. लोक सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. दुबईचे नाव ऐकल्यानंतरच लोक सोन्याची खरेदी करण्यापर्यंत पोहोचतात. दुबईमध्ये दिएरा नावाचे एक ठिकाण आहे, जिथून तुम्ही सहजपणे कमी किंमतीत सोने खरेदी करू शकता. पण तुम्हाला माहितेयं का भारतातही असे ठिकाण आहे, जिथून तुम्ही स्वस्त दरात सोने खरेदी करु शकता, चला तर जाणून घेऊया कोणते आहे हे ठिकाण…

देशातील सर्व शहरांमध्ये २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत वेगळी

सोने-चांदीच्या किंमती यापूर्वी वाढल्या, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यात प्रचंड चढ-उतार दिसून येत आहे. भारतातील प्रत्येक शहरात सोन्याचे भाव एकसारखे नसतात. देशाच्या वेगवेगळ्या सराफा बाजारात २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत वेगळी आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे राज्य सरकार आणि प्रशासनाने सोन्यावर लादलेला स्थानिक कर, जो प्रत्येक राज्यात आणि शहरात वेगळा आहे.

(हे ही वाचा: Cheapest Laptop Market: भारतातील ‘या’ बाजारात किलोच्या भावाने मिळतात लॅपटॉप! )

भारतातील शहरांमध्ये सोन्याचे भाव वेगळेवेगळे का असतात?

भारतात सोन्याची खाण जास्त नाहीत. जवळपास सर्व सोने देशात आयात केले जाते. हे सोने स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, येस बँक, युनियन बँक इत्यादी काही मोठ्या बँकांकडून आयात केले जाते. तसेच, एमएमटीसी, एसटीसी इत्यादी आहेत ज्यांना सोने आयात करण्याची परवानगी आहे. या संस्था आंतरराष्ट्रीय किमतीनुसार सोने आयात करतात. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमती भारतातील सोन्याच्या किमतींपेक्षा जास्त असल्यास, ते देखील अधिक सरकते.

‘या’ ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त सोनं

देशातील सर्वात स्वस्त सोनं केरळमध्ये मिळतं. केरळमधील कोचीन शहरात तुम्हाला मलबार गोल्ड, भीमा ज्वेलर्स, जोयलुकास यासारख्या ठिकाणाहून कमी किंमतीत सोनं खरेदी करण्याची संधी मिळू शकते. दक्षिण भारतातील बहुतेक राज्यांत सोन्याची किंमत पश्चिम आणि उत्तर भारताच्या तुलनेत कमी आहे. कर्नाटक आणि केरळमध्ये मुंबई किंवा दिल्लीपेक्षा स्वस्त सोनं आहे.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 18:27 IST
ताज्या बातम्या