द जंगल बुकच्या मोगली या पात्राची भुरळ कुणाला पडलेली नाही? संपूर्ण जगभरात त्याचे चाहते आहेत. मात्र मोगली नावाचं हे कॅरेक्टर रुडयार्ड किपलिंग म्हणजेच ज्यांनी जंगल बुक लिहिलं त्यांना कुठे आढळलं माहित आहे? हे पात्र होतं भारतात. होय आम्ही आज तुम्हाला खऱ्याखुऱ्या मोगलीची ही खरीखुरी गोष्ट सांगणार आहोत. त्यांचं नाव आहे दीना शनिचर. रुडयार्ड यांना मोगलीचं काल्पनिक पात्र दीना शनिचर यांच्यावरुन सुचलं होतं असं सांगितलं जातं. आम्ही तुम्हाला ज्यांच्याबद्दल सांगणार आहोत त्यांच्याविषयीचं वृत्त Historic Vids या ट्वीटरने दिलं आहे.

काय आहे खऱ्या खुऱ्या मोगलीची गोष्ट?

१८८९ मध्ये बुलंदशहर या ठिकाणी जंगलात दीना शनिचर सापडले होते. दीना शनिचर यांचं वय त्यावेळी सहा वर्षे इतकंच होतं. लांडग्यांच्या सहवासात ते मोठे झाले होते. त्यामुळे ते लांडग्यांसारखा आवाज काढणं आणि त्यांच्या प्रमाणे हालचाली करणं हे जाणत होते. ब्रिटिशांचे लष्करी अधिकारी विल्यम स्लीमन यांनी जर्नी थ्रू किंग्डम ऑफ अवध नावचं पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्येही दीना शनिचर यांचा उल्लेख आहे. ते पुस्तकात म्हणतात काही शिकाऱ्यांनी जंगलातून एका लहान मुलाला आणलं. हा मुलगा प्राण्यांप्रमाणेच हालचाली करत होता आणि त्यांचीच भाषा बोलत होता. त्या मुलाला मानवी भाषा येत नव्हती. स्लीमन यांनी लिहिलेल्या माहितीनुसार जेव्हा लांडगे एखाद्या मुलाला घेऊन जातात तेव्हा त्याची शिकार करतात. मात्र या मुलाला त्यांनी जिवंत ठेवलं होतं. हा मुलगा लांडग्यांच्या पिल्लांसह मोठा झाला होता. दीना शनिचर यांना उत्तर प्रदेशातल्या जंगलातून लांडग्यांनी उचललं होतं. सिकंदर अनाथ आश्रमात त्यांना आणलं गेलं.

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल

स्लीमन यांच्या पुस्तकात काय उल्लेख आहे?

स्लीमन यांच्या पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी म्हटलं आहे सुल्तानपूरपासून दहा मैल दूर अंतरावर लांडग्यांच्या घोळक्यात एक लहान मुलगा आढळला. स्थानिक राज्यपालाने एका सैनिकाला करवसुलीसाठी जंगलात पाठवलं होतं. तेव्हा चंदोर नदीच्या जवळ लांडग्यांच्या घोळक्यात एक मुलगा त्या सैनिकाला दिसला. त्याच्या मागे तीन लांडके होते. हा मुलगा पाच-सहा वर्षांचा होता. मात्र तो स्वतःच्या पायावर चालत नव्हता तर लांडग्यांप्रमाणेच पंजांवर म्हणजेच दोन्ही हात दोन्ही पाय जमिनीवर टेकवून चालत होता. सैनिकाने जेव्हा या मुलाला पाहिलं तेव्हा त्याला पकडायचा प्रयत्न केला. मात्र तो मुलगा पळून गेला. त्यानंतर जेव्हा त्या मुलाला पकडलं तेव्हा अनाथ आश्रमात आणलं. जंगल बुक हे पुस्तक ज्यांनी लिहिलं ते किपलिंग त्यांना याच पात्रावरुन मोगली लिहिलण्याची प्रेरणा मिळाली. कारण किपलिंगचा जन्मही भारतातच झाला होता.

दीना शनिचर यांचा स्वभाव कसा होता?

पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे दीना शनिचर यांचा स्वभाव हा प्राण्यांसारखाच होता. त्यांना कुठलीही बोली भाषा अवगत नव्हती. त्यानंतर त्यांना माणसांमध्ये आणलं गेलं मात्र ते बोली भाषा शिकू शकले नाहीत. दीना शनिचर हे लांडग्यांप्रमाणे आवाज काढत असत. त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना दोन पायांवर चालण्यास अडचण येत होती. कपडे घालणं त्यांना मुळीच आवडत नव्हतं. त्यांना खायला फक्त कच्चं मांस आवडत होतं. नंतर ते शिजवलेलं अन्नही खाऊ लागले होते. मात्र अन्न समोर आलं की नाकाने त्याचा वास घ्यायची सवय सुटली नव्हती. माणसांची आणि दीना शनिचर यांची फारशी ओळख झाली नव्हती. माणसांकडून ते धूम्रपान करायला शिकले होते.

रुडयार्ड किपलिंग यांनी हे मान्य केलं नव्हतं की त्यांनी जंगल बुकमध्ये साकारलेला मोगगली हा दीना शनिचरवरुन प्रेरित होता. त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यात म्हटलं आहे की मेसोनिक लायन्स ऑफ माय चाईल्डहूड मॅगझिन आणि रायडर हेगार्ड यांनी लिहिलेली कादंबरी नाडा द लिली या दोन पुस्तकांवरुन मी माझं जंगल बुक हे पुस्तक लिहिलं होतं. मात्र १८९५ च्या पत्रात त्यांनी असाही उल्लेख केला होता की मी नेमका कुठल्या कुठल्या गोष्टींवरुन प्रेरित झालो होतो हे सांगता येणं कठीण आहे. त्यामुळेच दीना शनिचरवरुन मोगली लिहिला गेल्याची चर्चा अनेकदा होते.

दीना शनिचर हे नाव कसं पडलं?

दीना शनिचर यांना जंगलातून अनाथ आश्रमात आणण्यात आलं तो दिवस शनिवारचा होता. तसंच ज्या दिवशी ते सापडले होते तो शनिवारचा दिवस होता. शनिवारी दिवसा ते सापडले त्यामुळे त्यांचं नाव ठेवलं गेलं दीना शनिचर. दीना शनिचर यांना मनुष्याप्रमाणे धूम्रपान करायची सवय लागली होती. अनाथ आश्रमात आणल्यानंतर वयाच्या २० व्या किंवा २१ व्या वर्षी क्षय रोग होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू वयाच्या कितव्या वर्षी झाला याची माहिती उपलब्ध नाही. मात्र टीबी झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाला.