scorecardresearch

भारतातील ‘हे’ ३ रेल्वे मार्ग थेट परदेशात जातात; पहिल्या रेल्वेमार्गाचे नाव वाचून तुम्हीही थक्क व्हाल

भारतातील काही रेल्वे मार्ग थेट परदेशात जातात, यांची नावे वाचून तुम्हीही थक्क व्हाल

indian railway route
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

भारतीय रेल्वे हे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. एकूण ६७,००० किमी लांबीच्या मार्गासह, भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. यामध्ये भारतातील वेगवेगळ्या धावणाऱ्या विविध प्रकारच्या ट्रेन्सचे मोठे नेटवर्क आहे. मात्र भारतीय रेल्वे केवळ भारतापुरती मर्यादित नाही. ती भारताच्या सीमेपलीकडे जाणाऱ्या अनेक गाड्या चालवते.

आपल्या देशातील अनेक लोकांनी त्या मार्गाने प्रवास केला असेल. पण बहुतेक लोकांना याबाबत माहिती नसेल. याचमुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, परदेशी ट्रेन भारताच्या कोणत्या मार्गावरून जाते.

समझोता एक्सप्रेस

समझोता एक्सप्रेस २२ जुलै १९७६ ला भारत आणि पाकिस्तान शिमला करारावर स्वाक्षरी केल्यानंतर सुरू करण्यात आली. सुरुवातीला ही ट्रेन भारतातील अमृतसर आणि पाकिस्तान मधील लाहोरपर्यंत धावत होती. परंतु नंतर १९८० च्या दशकात भारत सरकारने भारत पाकिस्तान सीमेवरील अटारी येथे प्रवास बंद करण्याचा निर्णय घेतला. अमृतसर ते लाहोर या ट्रेनचा प्रवास ५२ किमी आहे. जेव्हा रेल्वे सेवा सुरू झाली तेव्हा ही ट्रेन दररोज धावत होती. पण नंतर ती सोमवार आणि गुरुवारी धावणारी द्वि-साप्ताहिक ट्रेन बनवण्यात आली.

१४ एप्रिल २००० रोजी, समझोता एक्सप्रेसने कापलेले अंतर एकूण ३ किमी इतके कमी झाले. असे ठरले की, भारतीय रेल्वे दिल्ली ते अटारी एक ट्रेन चालवेल आणि सर्व प्रवासी कस्टम आणि इमिग्रेशनसाठी दिल्लीला उतरतील. अटारी येथे ते ट्रेन बदलतील आणि समझोता एक्सप्रेस पकडतील. जी त्यांना भारत पाकिस्तान सीमेच्या पाकिस्तानी बाजूने वाघा येथे घेऊन जाईल. भारत पाकिस्तान या मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशाला सर्वात महत्वाचा कागदपत्र असणे गरजेचा आहे ते म्हणजे व्हिसा. जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलम रद्द केल्यामुळे निर्माण झालेल्या तनावामुळे सध्या समझोता एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

मैत्री एक्सप्रेस

कोलकाता आणि ढाका दरम्यान गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणारी मैत्री एक्सप्रेस ही एकमेव ट्रेन आहे. २००८ मध्ये सुरू झालेली बांग्लादेशातील ढाका ते भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता यांना जोडणारी ही पहिली पूर्ण वातानुकूलित ट्रेन आहे. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर या प्रदेशात रेल्वेसेवा विस्कळीत झाली . परंतु दोन्ही देशाच्या संस्कृतीने कधीही संबंध तोडले नाहीत.

( हे ही वाचा: साप चंदनाच्या झाडाला लिपटून का असतात? यामागचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल)

बंधन एक्सप्रेस

भारत आणि बांग्लादेश दरम्यान धावणारी ही दुसरी आंतराष्ट्रीय प्रवासी ट्रेन आहे. बंधन एक्सप्रेस भारताच्या कोलकाता शहरापासून सुरू होते, आणि बांग्लादेशातील खुलना शहरापर्यंत जाते. ९ नोव्हेंबर २०१७ रोजी सुरू झालेली बंधन एक्सप्रेस बारीसाल एक्सप्रेसच्याच मार्गावर धावते. उद्घाटन झाल्यापासून ट्रेन फक्त गुरुवारी धावते, परंतु फेब्रुवारी २०२० मध्ये वारंवारता वाढवण्यात आली आणि आता ही ट्रेन आठवड्यातून दोनदा धावते,

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 13:26 IST
ताज्या बातम्या