जंगल म्हणजे काय? जंगल म्हटले की, एक मोठा, घनदाट वृक्षाच्छादित क्षेत्र; ज्यामध्ये झाडे, वनस्पती, प्राणी आणि इतर जीवांचा समुदाय वास्तव्यास असतो. मूळात जंगल ही एक नैसर्गिक परिसंस्था (Natural Ecosystem) आहे. जंगल बहुतेकदा त्याच्या उच्च वृक्ष घनतेद्वारे वैशिष्ट्यीकृत असते; ज्यामध्ये झाडे जमिनीच्या क्षेत्राचा महत्त्वपूर्ण भाग व्यापतात. पण, प्रत्येक देशात नैसर्गिक जंगले आहेत का?

जागतिक बँकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगात असे चार देश आहेत; ज्यांना वनक्षेत्र नाही. बरं, किमान पारंपरिक प्रकार नाही. त्यांच्याकडे मानवनिर्मित लाकूड आणि वृक्षारोपण क्षेत्र असू शकते. परंतु, जेव्हा घनदाट नैसर्गिक जंगलाचा विचार केला जातो तेव्हा या चार देशांकडे ते नक्कीच नाही.

What is A B form Why A B form so important during elections
ए. बी. फॉर्म म्हणजे काय? या फॉर्मला निवडणूक काळात इतके महत्त्व का?
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

सॅन मारिनो (San Marino)

सॅन मारिनो (San Marino)
सॅन मारिनो हे सर्वात लहान देश आहे जो दक्षिण युरोप आणि इटलीने वेढलेला आहे. त्याच्या लहान आकार आणि डोंगराळ प्रदेशामुळे येथे मर्यादित क्षेत्रामध्येच कोणत्याही प्रकारची हिरवळ पाहायला मिळते. त्यापैकी बहुतांश हिरवळ ही शेतीयोग्य जमिनीमुळे पाहायला मिळते. अनेक दशकांपूर्वी युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक कमिशन फॉर युरोपने सॅन मारिनोमध्ये ७४ रोपे लावून, ती वाढवली आणि अशा प्रकारे जंगल तयार केले होते. असे हे मानवनिर्मित जंगल आहे; पण येथे नैसर्गिक जंगल नाही.

कतार (Qatar)

कतार हा अरबी द्वीपकल्पाच्या ईशान्य किनार्‍यावर वसलेला एक छोटासा देश आहे. हा प्रदेश येथील वाळवंटासाठी ओळखला जातो. कतार हा जगातील सर्वांत श्रीमंत देशांपैकी एक देश आहे. हे काही रहस्य नाही; पण या समृद्ध देशात हिरवळीने बहरलेले जंगलच नाही; पण वाळवंटात अशी स्थिती असू शकते. मात्र, कतारकडे अशा प्रकारची संसाधने असल्यामुळे या देशाने स्वत:ला जगातील सर्वांत मोठ्या मानवनिर्मित जंगलांपैकी एक होण्याचा मान मिळविला आहे.

हेही वाचा –Daylight Saving Time : ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ म्हणजे काय? जगभरात का होते चर्चा? जाणून घ्या कारण!

ग्रीनलँड (Greenland)

ग्रीनलँड हा डेन्मार्क किंगडममधील एक स्वायत्त प्रदेश; जो प्रामुख्याने बर्फाने व्यापलेला आहे आणि येथे अतिशय मर्यादित वनक्षेत्र आहे. देशात जे काही जंगल आहे, ते प्रजातींच्या (species) कमतरतेमुळे जंगलांच्या श्रेणीत येत नाही. येथे हिरवळ म्हणून जमिनीवर पसरलेल्या कॉमन ज्युनिपर (common juniper) झुडपांच्या विपुल प्रजाती आहेत.

हेही वाचा –जागतिक वारसा स्थळे कशी निवडली जातात? घ्या जाणून…

ओमान (Oman)

ओमानमध्ये विस्तृत जंगल नसले तरी काही जंगले आहेत. तेथे सुमारे २००० एकरवर रोपांची लागवड करून, जंगल तयार करण्यात आले आहे. प्रामुख्याने वाळवंट असलेल्या देशांसाठी मानवनिर्मित जंगलांनी चांगले काम केले आहे.

Story img Loader