scorecardresearch

Premium

एका सफरचंदाची किंमत ५०० रुपये! काय आहे या डायमंड सफरचंदाची खासियत, पाहा…

डायमंड सफरचंद हे चवीला आंबट-गोड असून, याचा रंग काय आणि या फळाची लागवड कुठे होते हे पाहा.

Tibetan black diamond apple
केवळ तिबेटमध्ये सापडते काळ्या रंगाचे, डायमंड सफरचंद. [photo credit – इन्स्टाग्राम]

जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात विविध प्रकारची, रंगांची, चवींची फळं निसर्गाकडून आपल्याला प्राप्त होत असतात. काही फळांचा वापर औषध म्हणून होतो, तर काही फळं त्यांच्या अप्रतिम चवीसाठी खाल्ली जातात. आशिया खंडात जशी उष्णकटिबंधीय [ट्रॉपिकल] फळांमध्ये भरपूर विविधता असते, तशी उत्तर अमेरिकेकडे निसर्गाने त्यांच्या हवामानानुसार बेरी फळांची विविधता दिली आहे. पण, या सर्व फळांमधून काही आगळीवेगळी फळं लोकांचं लक्ष वेधून घेत असतात. अश्या फळांमध्ये, तिबेटमधील डायमंड सफरचंदाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या सुंदर आकारामुळे, सुंदर रंगामुळे आणि आंबट-गोड चवीने या फळाला एक विशेषत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच या एका डायमंड सफरचंदाची किंमत ५०० रुपये इतकी आहे. हे डायमंड सफरचंद चायनामध्ये असलेल्या तिबेटमधील न्यिंगची पर्वतरांगांमध्ये आढळणारे फळ आहे.

पण, या सफरचंदामध्ये विशेष काय आहे?

ही डायमंड सफरचंद, मर्यादित प्रमाणात असल्याने, याची विक्रीदेखील ठराविक होते. म्हणून या सफरचंदाची किंमत इतकी जास्त असते. त्यामुळे याची विक्री चायनामधील केवळ सर्वोत्तम विक्रेत्यांमध्ये केली जात असून, ही फळं सहजासहजी कोणाला मिळू शकत नाही. त्यातही प्रत्येक व्यक्तीला मर्यादित फळंच मिळतात, असे स्लर्प [slurrp] च्या माहितीवरून समजते.

adhipati ukhana
Video: “आईसाहेबांसारखी आई अख्ख्या पृथ्वीतलावर नाही…,” अधिपतीचा अक्षरासाठी खास उखाणा
soham bandekar
“तुझा कधीही न पाहिलेला फोटो आहे का?” सोहम बांदेकर म्हणाला “माझ्याकडे माझा…”
adhipati and akshara
“तुला शिकवीन चांगलाच धडा”; अधिपतीने घेतला अक्षरासाठी भन्नाट उखाणा
star pravah sukh mhanje nakki kay asta serial again troll
Video: “मालिका बंद करा”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले; नेमकं काय घडलं?

हे डायमंड सफरचंद चवीला अतिशय गोड असून, त्याचा बाहेरचा भाग घट्ट आणि कडक असल्याने ही फळं नावाप्रमाणे हिऱ्यासारखी चमकदार दिसतात. या फळाला गडद जांभळा रंग असून, त्याचा आतील भाग म्हणजेच गर हा पांढऱ्या रंगाचा आहे. हिमालयाजवळील न्यिंगची या प्रदेशात उगवणाऱ्या या फळाच्या रंगाचे श्रेय अभ्यासकांनी रात्रीच्या वेळी या प्रदेशातील बदलणाऱ्या तापमानाला आणि मुबलक अतिनील किरणांना दिले आहे. परिणामी, सफरचंदाला काळा रंग प्राप्त होण्यास मदत झाली असून, तिबेटमधील अशा वातावरणामुळे हे डायमंड सफरचंद केवळ त्याच प्रदेशात उगवू शकते.

हेही वाचा : १०० कच्च्या अंड्यांचा बल्क पिऊन पठ्ठ्याने केला आनंद साजरा; व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा…

ही सफरचंद तयार होण्यासाठी जवळपास आठ वर्षांचा कालावधी लागतो. आपली नेहमीची सफरचंद तयार होण्यासाठी केवळ दोन ते तीन वर्षांचा वेळ लागतो. या प्रदेशातील डोंगर, पर्वत हे उंच असून त्यांना भरपूर उतारदेखील असतो. म्हणून तिकडच्या लोकांना या फळांची मोठ्या प्रमाणात लागवड करणे अवघड असते. ऑक्टोबर महिन्याच्या आसपास केवळ दोन महिन्यांसाठी तयार सफरचंद गोळा करता येतात. त्यातही सर्व सफरचंद सर्वोत्तम प्रतीची असतीलच असं नाही. तयार सफरचंदांपैकी केवळ ३० टक्के सफरचंद बाजारात विक्रीसाठी पोहोचू शकतात.

एक्स [ट्विटर] या सोशल मीडियाच्या माध्यमातून @massimo नावाच्या हँडलने आपल्या अकाउंटवरून या काळ्या रंगाच्या, डायमंड सफरचंदाचा फोटो शेअर केला असून, “आपण साधारण लाल, हिरवी, पिवळी सफरचंद पहिली असतील; पण जेव्हा भौगोलिक परिस्थिती जुळून येते तेव्हा निसर्ग आपल्याला गडद जांभळ्या, जवळपास काळ्या रंगाचे सफरचंद देतो. ही डायमंड सफरचंद असून, याची लागवड तिबेटमध्ये होते”, असे फोटोला कॅप्शनदेखील दिले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tibetan black diamond apple is rare and one apple costs for 500 rupees dha

First published on: 20-11-2023 at 09:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×