What is the Right Time to Use the Toilet in a Train: भारतातील रेल्वे हे जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक मानले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यांना जोडणारे हे विस्तीर्ण रेल्वे नेटवर्क दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानी पोहोचवत असते. आरामदायी, किफायतशीर आणि सोईस्कर सेवा मिळत असल्यामुळे अनेक जण प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य देतात.
प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वेत आसनव्यवस्था, पॅन्ट्री कार, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि शौचालयांची व्यवस्था केली जाते. मात्र, रेल्वेतील शौचालये वापरताना काही नियम पाळणे आवश्यक असते. अनेक प्रवासी नकळत अशा वेळी शौचालयाचा वापर करतात, जेव्हा तो टाळणे अधिक योग्य मानले जाते. मग नेमक्या कोणत्या वेळी रेल्वेतील शौचालय वापरणे टाळावे? याबाबतची माहिती जाणून घेणे प्रत्येक प्रवाशासाठी महत्त्वाचे ठरू शकते.
स्थानकावर उभी असताना रेल्वेतील शौचालय वापरणे टाळा
आजही रेल्वेच्या अनेक डब्यांमध्ये जुन्या प्रकारची शौचालय व्यवस्था आहे. अशा शौचालयांमधील सांडपाणी थेट रुळांवर पडते. रेल्वे धावत असताना त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. मात्र, रेल्वे स्थानकावर थांबलेली असताना शौचालयाचा वापर केल्यास मैला थेट प्लॅटफॉर्मच्यानजीकच्या रुळांमधील जागेत पडून साचून राहू शकतो.
त्यामुळे स्वच्छतेवर विपरीत परिणाम होऊन, स्थानक परिसर अस्वच्छ होऊ शकतो. म्हणूनच शक्य असल्यास रेल्वे स्थानकात उभी असताना शौचालयाचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो.
शौचालयात पाणी नसल्यास वापर करू नका
प्रवासादरम्यान कधी कधी शौचालयातील पाण्याचा साठा संपतो. अशा परिस्थितीत शौचालय वापरल्यास अस्वच्छता निर्माण होऊ शकते. तसेच पुढील प्रवाशांनाही गैरसोय होऊ शकते.
म्हणून शौचालयाचा वापर करण्यापूर्वीच तेथे पुरेसे पाणी उपलब्ध आहे का, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी नसेल, तर पुढील स्थानकावर पाणी भरल्यानंतरच शौचालय वापरणे अधिक योग्य ठरू शकते.
रेल्वे सुरू होताना किंवा थांबत असताना सावध राहा
रेल्वे हळूहळू सुरू होत असताना किंवा स्थानकात प्रवेश करताना अनेकदा धक्के बसतात. तसेच काही वेळा सिग्नलमुळे रेल्वेगाडी पढील हिरवा सिग्नल मिळेपर्यंत थोडी प्रतीक्षा थांबते आणि पुन्हा सुरू होते. अशा वेळी डब्यांमध्ये अधिक हालचाली जाणवतात.
जर तुम्ही त्यावेळी शौचालयात असाल, तर अचानक तोल जाण्याची शक्यता असते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले किंवा आरोग्यविषयक अडचणी असलेल्या प्रवाशांनी अशा वेळी अधिक काळजी घेणे आवश्यक असते.
मग शौचालय कधी वापरावे?
रेल्वे सुरळीत वेगाने धावत असताना आणि शौचालयात पुरेसे पाणी उपलब्ध असताना त्याचा वापर करणे अधिक सोईचे मानले जाते. त्यामुळे प्रवासही सुरक्षित होतो आणि स्वच्छताही टिकून राहते.
शौचालय अस्वच्छ असल्यास काय कराल?
कधी कधी रेल्वेतील शौचालय अस्वच्छ असल्याचे दिसून येते. अशा वेळी दुर्लक्ष करण्याऐवजी रेल्वे कर्मचाऱ्यांना त्याबाबतची माहिती द्यावी. तसेच रेल्वेच्या तक्रार व्यवस्थेद्वारेही तक्रार नोंदवता येते. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून लवकर ???कारवाई (की- कार्यवाही) होण्यास मदत मिळू शकते.
रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि स्वच्छ व्हावा यासाठी प्रवाशांनीही काही मूलभूत नियम पाळणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या वाटणाऱ्या या गोष्टी केवळ तुमचाच नव्हे, तर इतर हजारो प्रवाशांचाही प्रवास अधिक सुखकर बनवू शकतात.
