What is the Full Form of TVS: आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या आपण वारंवार पाहतो, वापरतो… पण, त्यांच्याबद्दलची अगदी साधी माहितीही आपल्याला माहीत नसते. कारण आपण कधी त्याबद्दल विचारच करत नाही. कोणी प्रश्न विचारेपर्यंत ती गोष्ट आपल्या लक्षातही येत नाही आणि एकदा प्रश्न पडला की, “अरे, हे तर आपण कधी विचारलंच नाही!” असं वाटतं. आज आपण अशाच एका गोष्टीचा उलगडा करणार आहोत… जी तुमच्या रोजच्या जीवनाशी जोडलेली आहे. तुम्हीही कदाचित ती वापरत असाल… पण, तिचं पूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे का?

TVS – नाव ओळखीचं, पण फुल फॉर्म माहीत आहे का?

बाईक हा अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. शहर असो किंवा गाव, रोजच्या प्रवासासाठी बाईक सर्वात सोयीचं वाहन मानलं जातं. विशेषतः तरुणांमध्ये बाईक चालवण्याची प्रचंड आवड दिसून येते. आज मुलं-मुली दोघेही आत्मविश्वासाने रस्त्यावर बाईक चालवताना दिसतात. या सगळ्यात एक नाव सतत ऐकू येतं-TVS Motor Company. अनेक जण या कंपनीच्या गाड्या वापरतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात, पण एक साधा प्रश्न विचारला तर अनेक जण थांबतात; TVS चा फुल फॉर्म काय आहे? थोडा विचार करा… कदाचित तुम्हालाही उत्तर माहीत नसेल!

हा आहे TVS चा खरा अर्थ

TVS हा फक्त एक शॉर्ट फॉर्म नसून, त्यामागे एका व्यक्तीचं पूर्ण नाव दडलं आहे. TVS चा फुल फॉर्म आहे – ‘Thirukkurungudi Vengaram Sundram.’ हे नाव ऐकून थोडं वेगळं वाटेल, पण याच नावावरून या कंपनीचं नामकरण झालं आहे. हे नाव TVS ग्रुपचे संस्थापक तिरुक्कुरुंगुडी वेंगाराम सुंदरम अयंगर यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या नावातील आद्याक्षरांवरून “TVS” हा ब्रँड तयार झाला आणि आज तो भारतातील एक मोठा आणि विश्वासार्ह वाहन ब्रँड बनला आहे.

BMW – नाव माहीत, पण फुल फॉर्म?

आता आणखी एक प्रसिद्ध नाव… जे जवळपास प्रत्येकाला माहीत आहे-BMW महागड्या आणि लक्झरी कारसाठी ओळखली जाणारी ही कंपनी अनेकांची ड्रीम कार बनली आहे. पण, इथेही तोच प्रश्न-BMW चा फुल फॉर्म काय आहे? अनेकांना वाटतं की ही फक्त तीन अक्षरं आहेत… पण त्यामागेही एक मोठं नाव आहे. BMW चा फुल फॉर्म आहे – Bayerische Motoren Werke. हे जर्मन भाषेतील नाव आहे. इंग्रजीत याचा अर्थ होतो: Bavarian Motor Works…

या गोष्टीतून काय शिकायला मिळतं?

आपण रोज वापरत असलेल्या गोष्टींबद्दलची मूलभूत माहितीही अनेकदा आपल्याला माहीत नसते. साधे प्रश्नही कधी कधी मोठं ज्ञान देऊन जातात. ब्रँड नावांच्या मागे इतिहास आणि व्यक्तिमत्त्व दडलेलं असतं…

TVS असो किंवा BMW-ही फक्त नावं नाहीत, तर त्यांच्या मागे मोठी कथा आणि इतिहास दडलेला आहे. पुढच्या वेळी तुम्ही तुमची बाईक किंवा कार पहाल, तेव्हा एकदा जरूर विचार करा. “या नावामागे काय कथा असेल? कारण कधी कधी… सर्वात साध्या गोष्टीतच सर्वात मोठं रहस्य लपलेलं असतं!