Yogi Adityanath Net Worth : आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ५१ वा वाढदिवस आहे. योगी आदित्यनाथ हे भाजपचे मातब्बर नेते मानले जातात. उत्तराखंडच्या पंचूर या गावी योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव अजय सिंह बिष्ट आहे. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आणि आपले नाव बदलले. संन्याशीपासून ते एका राजकारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांना प्रेरित करणारा आहे पण तुम्हाला माहिती आहे का योगी आदित्यनाथ यांच्याजवळ किती संपत्ती आहे ? आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक-२०२२ मध्ये योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधून निवडणूक लढवली. त्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी शिक्षणासह मालमत्ता नमूद केली होती.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…

हेही वाचा : अपघातामुळे रुळावरुन घसरलेली रेल्वे पुन्हा रुळावर कशी नेली जाते? पाहा Video

‘इंडिया टुडे’नी दिलेल्या वृत्तानुसार या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्याजवळ १.५४ कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. ही रक्कम त्यांच्या एकूण सहा बँक अकाउंट आणि सेव्हिंगमधील आहे. याशिवाय त्यांच्याकडे १ लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि ८० हजाराची रायफल आहे.

या प्रतिज्ञापत्रात सांगितल्याप्रमाणे, योगी आदित्यनाथ यांच्याजवळ १२,००० रुपयांचा सॅमसंगचा फोन आहे. २० ग्रॅमचे कानातले आहे, ज्याची किंमत ४९,००० रुपये आहे तर सोन्याच्या चेनसह रुद्राक्ष असा गळ्यात घालणारा १० ग्रॅमचा दागिना आहे, ज्याची किंमत २०,०००रुपये आहे.

हेही वाचा : Bye शब्दाचा अर्थ माहितीये का? कुणालाही बाय बोलण्याआधी फुल फॉर्म जाणून घ्या

या प्रतिज्ञापत्रात त्यांनी सांगितल्याप्रमाणे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये त्यांचे उत्पन्न १३,२०,६५३ रुपये होते तर २०१९-२० मध्ये १५,६८,७९९ रुपये, २०१८-१९ मध्ये १८,२७,६३९ रुपये आणि २०१७-१८ मध्ये १४,३८६७० रुपये होते. याशिवाय २०२२ च्या या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे कोणत्याही वाहनाची नोंदणी नाही.

२०२२च्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. उत्तर प्रदेशसह देशभरात लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ख्याती आहे