आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयाचे प्रमुख ओळखपत्र असते. पॅनकार्ड, बॅंकेचे अकाउंट यांच्याशी आधार कार्ड जोडलेले असते. आपण कुठेही गेलो तरी आधार कार्ड सोबत कॅरी करणे आवश्यक असते. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) यांच्याद्वारे दिले जाणारे आधार कार्ड हे भारतीयांसाठीच्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक आहे. ठराविक काळानंतर आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असते. असे केल्याने आपली अपडेटेट माहिती शासनापर्यंत पोहोचण्यास मदत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधार कार्ड अपडेट करण्यापूर्वी त्याची Update History तपासणे आवश्यक असते. UIDAI ने भारतीय नागरिकांसाठी आधारच्या Update History चा ऑनलाइन मागोवा घेण्याची सोय केली आहे. यासाठी लोकांना UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉग इन करावे लागणार आहे. या नव्या फीचरच्या मदतीने लोकांना त्यांचा पत्ता, ई-मेल तसेच मोबाइस नंबर अशा माहितीच्या Update requests चा ट्रॅक ठेवता येणार आहे.

हे सर्व अपडेट्स UIDAI च्या डेटाबेसमध्ये Update Request Number (URN) अंतर्गत संग्रहित केले जाणार आहेत. नागरिकांना बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक डिटेल्स अपडेट करता येणार आहे. तसेच त्यांचा ऑनलाइन स्टेटस पाहता येणार आहे.

आणखी वाचा – आधार कार्ड वापरून Google Pay अकाऊंट कसे अ‍ॅक्टिव्ह करावे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

आधार कार्ड Update History तपासण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

  • UIDAI या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तेथे होम पेजवर Under your Aadhar असे लिहिलेले दिसेल.
  • त्यांच्याखालच्या बाजूला Aadhaar update history असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • पुढे आधार कार्डची माहिती भरुन लॉग इन करा. लॉग इन करताना तुम्हाला OTP येईल.
  • त्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा तपशीलवार रेकॉर्ड पाहायला मिळेल.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to check aadhaar card update history then follow these easy steps know more yps
First published on: 09-06-2023 at 13:39 IST