२६ जानेवारी २०२१ रोजी भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. २६ जानेवारी…याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारत नावारुपाला आला. पण देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन कसा साजरा झाला असेल असा कधी तुम्हाला प्रश्न पडला का? २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाऊसच्या दरबार हाऊसमध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. १९५०, १९५२ साली साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ एका युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आले आहेत.

जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि इतिहास

UPSC 2023 Topper Aditya Srivastava
अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
lokmanas
लोकमानस: पंतप्रधान ‘या’ प्रश्नांची उत्तरे देतील?
Bharti Hexacom initial share sale from 3rd April
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री

६ मिनिटे २८ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि इतर काही अधिकारी पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे सैन्यदल आणि रणगाड्यांचे प्रात्यक्षिके पाहायला मिळत आहेत.

(व्हिडिओ सौजन्य- युट्यूब)

भाजी विक्रेते, रिक्षाचालक ते.. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडला ‘या’ VVIP पाहुण्यांना असेल हक्काचं स्थान

तर आणखी एका व्हिडिओत लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये कशाप्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा झाला हे पाहायला मिळत आहे. यामध्ये भारताचे ब्रिटनमधले पहिले उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन पुन्हा एकदा शपथ घेऊन भाषण देत आहेत.