दरवर्षी वीज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. वीज चमकणे एक नैसर्गिक घटना आहे. जेव्हा जास्त उष्णता आणि आर्द्रता असते तेव्हा विशेष प्रकारचे विजांचे मेघगर्जना करणारे ढग बनतात आणि वादळाचे रुप धारण करतात. पृष्ठभागापासून सुमारे ८-१० किमीवर या ढगांच्या खालच्या भागात निगेटिव्ह उर्जा आणि वरच्या भागात पॉझिटीव्ह उर्जा जास्त असते. जेव्हा दोन्हींमधील अंतर कमी होते तेव्हा त्यातून वीज वेगाने बाहेर येते. आपण ढगांमधील गडगडाट पाहू शकतो आणि त्यात कोणतेही नुकसान होत नाही. मात्र ढगांवरून वीज जमिनीवर आल्यावर मोठे नुकसान करते. वीज कोसळताना पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात ऊर्जा असलेला एक छोटासाच भाग खाली येतो. एकदा वीज कोसळल्याने कित्येक दशलक्ष वॅट्स ऊर्जा निर्माण होते. यामुळे आसपासचे तापमान १०,००० अंशांपासून ३०,००० अंशांपर्यंत वाढू शकते. परंतु, वीज कोसळल्याने होणारी जीवितहानी आणि वित्तहानी आता रोखता येऊ शकते. त्याकरता लाइटनिंग डिटेक्टर डिव्हाईस (Lightning Detection Device) उपलब्ध झाले आहेत. गडगडाटी वादळामुळे निर्माण होणारी वीज ओळखण्याचं कौशल्य या लाइटनिंग डिटेक्टरमध्ये आहे. मोकळ्या जागी, मोठ्या आवारात काम करणाच्या ठिकाणी किंवा सर्वाधिक वीज कोसळणाऱ्या एखाद्या शहरात या उपकरणाचा वापर सर्वाधिक केला जातो. हे उपकरण कसं काम करतं? वीज कोसळण्याच्या स्थितीत वातावरणीय बदल झाला असेल तर हे ३० ते ४० मिनिटाआधीच हे उपकरण कार्यान्वित होऊन त्यासंबंधीची माहिती देतं. वीज कोसळणाच्या स्थितीत उत्सर्जित इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स (EMP) शोधण्याचं काम हे उपकरण करतं. यादरम्यान EMP ची ताकद मोजून लायटनिंग स्ट्राईक किती दूर होता याचा अंदाज घेतला जातो. वीज कोसळताना एक वेगळा वेव्हफॉर्म असतो ज्यावर डिटेक्टरमार्फत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरद्वारे प्रक्रिया केली जाते. इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअरच्या प्रयोगाद्वारे, लाइटनिंग डिटेक्टर आपल्या स्थानाच्या ४० ते ७५ मैलांच्या आत वादळाची स्थिती ओळखतात आणि ट्रॅक करतात. वीज कोसळण्याच्या स्थितीतून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डबाबत अँटेनाला माहिती मिळाल्यानंतर त्याचा डेटा डिजिटल सिग्नलमध्ये रुपांतरित केला जातो. ही माहिती मायक्रोप्रोसेसरमध्ये फीड केली जाते. यातून वीज कोसळण्याच्या अर्धातास आधी उपकरणातून चेतावणी संदेश प्राप्त होतो. हेही वाचा >> समजून घ्या : दरवर्षी शेकडो लोकांचा जीव घेणारी वीज इतकी धोकादायक का असते? उत्तर प्रदेशमध्ये प्रयोग गेल्यावर्षीपासून उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये या उपकरणाचा वापर केला जात आहे. प्रयागराज, मिर्झापूर आणि ललितपूरमध्येही याचा वापर केला जातो. सोनभद्रच्या अनेक भागात अशी उपकरणे बसवली आहेत. हे यंत्र बसवल्यामुळे वीज पडून मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. वीज कोसळण्याच्या घटना कधी होतात? वार्षिक वीज कोसळ्याच्या २०१९-२० अहवालानुसार, २५ ते ३१ जुलै दरम्यान मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण आहे. यादरम्यान, देशभरात वीज कोसळण्याच्या चार लाखांहून अधिक घटनांची नोंद झाली. वीज कोसळणे इतके धोकादायक का आहे? आकाशातील विजेचे तापमान सूर्याच्या वरच्या पृष्ठभागापेक्षा जास्त असते. त्याची क्षमता ३०० केडब्ल्यू म्हणजेच १२.५ कोटी वॅट्सपेक्षा जास्त आहे. ही वीज एक मिलिसेकंदपेक्षा कमी काळ टिकते. वीज दुपारी पडण्याची शक्यता जास्त आहे. याचा मानसाच्या डोक्यावर, मानेवर आणि खांद्यावर सर्वाधिक परिणाम होतो.