What is Camera Called in Marathi: आजच्या काळात कॅमेरा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल असो, सीसीटीव्ही असो किंवा व्यावसायिक छायाचित्रणासाठी वापरला जाणारा आधुनिक कॅमेरा असो; प्रत्येक जण हा शब्द अगदी सहजपणे वापरतो. पण, कधी तुम्ही विचार केला आहे का की, आपण रोज वापरत असलेल्या कॅमेरा या उपयुक्त साधनालाला मराठीत नेमकं काय म्हणतात?
विशेष म्हणजे अनेक सुशिक्षित लोकांनाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. इंग्रजीतील अनेक शब्द आपल्या दैनंदिन बोलण्यात इतके मिसळून गेले आहेत की, त्यांना मराठीत पर्यायी शब्द अस्तित्वात आहेत, हेही अनेकांना ठाऊक नसते. कॅमेरा हा त्यापैकीच एक शब्द आहे.
शाळेत असताना मराठी व्याकरण किंवा भाषेच्या पुस्तकांमध्ये अनेक इंग्रजी शब्दांचे मराठी पर्यायी शब्द शिकवले जातात; मात्र कालांतराने ते विस्मरणात जातात. त्यामुळे जेव्हा अचानक असा प्रश्न विचारला जातो की, कॅमेऱ्याला मराठीत काय म्हणतात, तेव्हा अनेकांची गाडी अडते.
कॅमेऱ्याचा शोध लागल्यापासून जगभरातील संवाद आणि आठवणी जपण्याची पद्धतच बदलून गेली. एखादा सुंदर क्षण असो, कौटुंबिक समारंभ असो किंवा एखादी ऐतिहासिक घटना असो, कॅमेऱ्यामुळे ती कायमची जतन करून ठेवता येते. त्यामुळे हा शब्द आपल्या जीवनात इतका रुजला आहे की, त्यासाठी आपल्यखला पर्यायी मराठी शब्द वापरण्याची फारशी गरजच भासत नाही.
मात्र, मराठी भाषेत या उपकरणासाठी एक सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द आहे. हा शब्द ऐकल्यावर अनेकांना तो अगदी योग्य वाटतो. कारण- त्यातून कॅमेऱ्याचं कार्यही स्पष्ट होतं. कॅमेरा नेमकं काय करतो? तो प्रकाशाच्या मदतीनं एखादं दृश्य टिपतो आणि ते कायमस्वरूपी जतन करतो. त्यामुळे त्याच्या मराठी नावातही याच अर्थाची छटा दिसून येते.
आज सोशल मीडियावर अशा प्रश्नांची मोठी चर्चा होत असते. मराठी भाषेतील हरवलेले किंवा कमी वापरले जाणारे शब्द पुन्हा लोकांसमोर येत आहेत. त्यामुळे अनेकांना आपल्या भाषेची समृद्धी नव्यानं समजत आहे.
आता तुमचीही उत्सुकता वाढली असेल ना की, ‘कॅमेरा’साठी वापरला जाणारा तो मराठी शब्द कोणता?
तर, ‘कॅमेरा’ला मराठीत छायाचित्रक, ‘छायाचित्रण यंत्र’ किंवा ‘छायाचित्र टिपण्याचे यंत्र’, असे म्हणतात.
छाया म्हणजे सावली किंवा प्रतिमा आणि चित्रक म्हणजे चित्र निर्माण करणारे साधन. म्हणजेच छायाचित्र निर्माण करणारे उपकरण, असा या शब्दाचा अर्थ होतो. त्यामुळे पुढच्या वेळी कोणी तुम्हाला कॅमेऱ्याचा मराठी शब्द विचारला, तर आत्मविश्वासानं उत्तर द्या – छायाचित्र टिपण्याचे यंत्र!
