Do You Know the Real Meaning of EMI: आजच्या काळात EMI हा शब्द जवळपास प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. मोबाईल, टीव्ही, कार, घर… कुठलीही महाग वस्तू घ्यायची असेल, तर लगेच एक पर्याय समोर येतो EMI वर घ्या! पण एक प्रश्न मात्र अनेकांच्या मनात कधीच आला नाही EMI म्हणजे नक्की काय? याचा पूर्ण अर्थ काय आहे?
अनेक लोकांना वाटतं की, EMI म्हणजे Easy Monthly Installment… ऐकायला बरोबर वाटतं; पण खरंच हेच उत्तर आहे का? की यामागे काही वेगळंच रहस्य दडलंय?
EMI शिवाय खरेदी आता अपुरीच वाटते!
आज तुम्ही आजूबाजूला पाहिलंत, तर अनेक लोक महागड्या वस्तू EMI वर घेताना दिसतील. उदाहरणार्थ, iPhone-अनेक जण सांगतात, “लोनवर घेतला आहे, EMI भरतोय.”
फक्त मोबाईलच नाही, तर फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, अगदी कार आणि घरसुद्धा आता EMI वर घेतली जातात.
म्हणजेच, EMI हा पर्याय लोकांच्या खरेदीचा अविभाज्य भाग बनला आहे.
पण तरीही, याचा खरा अर्थ किती जणांना माहीत आहे?
EMI चा खरा अर्थ काय?
EMI चा खरा फुल फॉर्म आहे – Equated Monthly Installment
म्हणजेच एखाद्या कर्जाची किंवा वस्तूची किंमत दर महिन्याला समान हप्त्यांमध्ये (installments) परतफेड करणं, याला EMI म्हणतात.
Easy Monthly Installment हे शब्द वापरले जातात; पण फक्त सोप्या भाषेत सांगण्यासाठी खरे नाव मात्र Equated Monthly Installmentच आहे.
EMI ची सुरुवात कशी झाली?
हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण EMI ही संकल्पना भारतात नव्हे, तर अमेरिकेत सुरू झाली.
१९७० च्या दशकात ही पद्धत लोकप्रिय झाली आणि हळूहळू जगभर पसरली.
भारतामध्येही सुरुवातीला EMI इतकी सामान्य नव्हती. पण २०१६ नंतर, विशेषतः ई-कॉमर्स कंपन्यांनी हा पर्याय मोठ्या प्रमाणात आणल्यानंतर, EMI ने खरेदीचे स्वरूपच बदलून टाकले.
आज EMI का झालीय इतकी लोकप्रिय?
आजच्या धकाधकीच्या जीवनात एकदम मोठी रक्कम देणे अनेकांना कठीण जाते. अशा वेळी EMI हा पर्याय खूप उपयोगी ठरतो.
थोडी थोडी रक्कम भरत, लोक आपल्या आवडीच्या वस्तू सहज घेऊ शकतात.
त्यामुळे महाग वस्तू घेणेही आता सोपे झाले आहे.
पण त्याचवेळी, EMI घेताना व्याजदर, कालावधी आणि एकूण खर्च याचाही विचार करणे तितकेच महत्त्वाचं आहे.
निष्कर्ष – EMI वापरतो; पण समजून वापरणे गरजेचे
EMI ही संकल्पना आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली असली तरी तिचा खरा अर्थ आणि वापर समजून घेणे आवश्यक आहे.
पुढच्या वेळी EMI वर काही घेणार असाल, तर फक्त ‘सोईस्कर’ म्हणून नाही, तर समजून-उमजून निर्णय घ्या.
कारण…
EMI सोपी असली, तरी तिचे गणित समजून घेतले, तरच खऱ्या अर्थाने फायदा होतो.
