What Is Fridge Called in Marathi: घरी फ्रीजचा वापर होतो. शहर असो किंवा गाव, आज जवळपास प्रत्येक घरात ही वस्तू आढळते. दूध, भाजीपाला, फळे, पाणी, औषधे आणि इतर अनेक वस्तू ताज्या राहाव्यात यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. इतकेच नव्हे, तर उन्हाळ्यात थंड पाण्याची सोय करण्यासाठीही फ्रीज हे घरातील महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक उपकरण ठरले आहे.

आपण रोज फ्रीज हा शब्द सहजपणे वापरतो. त्यामधील एखादी वस्तू बाहेर काढायची असेल, तर आपण लगेच ‘फ्रीजमधून काढ’, असे म्हणतो. परंतु, तुम्ही कधी विचार केला आहे का की, या वस्तूला मराठीत नेमके काय म्हणतात?

विशेष म्हणजे अनेक सुशिक्षित लोकांनाही या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. कारण- फ्रीज हा शब्द इतका सर्वसामान्य झाला आहे की, त्याचे मराठी नाव जाणून घेण्याची गरजच अनेकांना वाटत नाही. इंग्रजीतील अनेक शब्द आपल्या दैनंदिन जीवनात इतके मिसळले आहेत की, त्यांच्या मराठी पर्यायांकडे आपण दुर्लक्ष करतो.

मराठी भाषेत अनेक वस्तूंना सुंदर आणि अर्थपूर्ण नावे आहेत. मात्र, काळाच्या ओघात इंग्रजी शब्दांचा वापर वाढल्यामुळे ही नावे मागे पडली. फ्रीजचेही काहीसे असेच झाले आहे. शाळेत मराठी शिकलेले अनेक विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी किंवा सामान्य नागरिक यांनाही या वस्तूचे शुद्ध मराठी नाव विचारले, तर ते विचारात पडतात.

सोशल मीडियावरही हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. ‘फ्रीजला मराठीत काय म्हणतात’ या प्रश्नावर हजारो लोक वेगवेगळी उत्तरे देतात. काही जण गमतीदार अंदाज लावतात, तर काही जण चुकीची माहिती देतात. त्यामुळे योग्य उत्तर नेमके कोणते, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.

खरे तर या वस्तूचे कार्य पाहिले, तर तिचे मराठी नाव समजणे अधिक सोपे होते. अन्नपदार्थ थंड ठेवणे, त्यांचा ताजेपणा टिकवून ठेवणे आणि त्यांची नासाडी होऊ न देणे हे या उपकरणाचे मुख्य काम आहे. याच कार्यावरून त्याचे मराठी नाव तयार करण्यात आले आहे.

तुम्हालाही आता उत्सुकता लागली असेल की, रोज वापरात असलेल्या या वस्तूचे खरे मराठी नाव नेमके काय आहे?

तर फ्रीजला मराठीत ‘शीतकपाट’ असे म्हणतात. ‘शीत’ म्हणजे थंड आणि ‘कपाट’ म्हणजे वस्तू ठेवण्याची जागा. म्हणजेच वस्तू थंड ठेवणारे कपाट, असा या शब्दाचा अर्थ होतो. मराठीतील हा शब्द अत्यंत समर्पक असूनही आज अनेकांना तो माहीत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी फ्रीजचा उल्लेख करताना ‘शीतकपाट’ हा सुंदर मराठी शब्द नक्की लक्षात ठेवा.