“हवाना सिंड्रोम” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गूढ न्यूरोलॉजिकल आजारानंतर सुमारे चार वर्षांनी, क्युबा, चीन आणि इतर देशांमध्ये अमेरिकन मुत्सद्दी आणि गुप्तचर कार्यकर्त्यांना त्रास होऊ लागला आहे. या सिंड्रोमचा पहिला रुग्ण क्युबामधील (cuba) हवानामध्ये आढळला होता. त्यामुळे या सिंड्रोमला हवाना नाव देण्यात आलंय. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या अहवालानुसार मायक्रोवेव्ह रेडिएशनमुळे हा सिंड्रोम होतो. या महिन्याच्या सुरुवातीला भारतभेटीसाठी आलेल्या एका सीआयए अधिकाऱ्याला हवाना सिंड्रोमची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आणि हवाना सिंड्रोम भारतात आढळल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे. त्यामुळे हवाना सिंड्रोम काय आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

हवाना सिंड्रोम काय आहे?

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

२०१६ च्या अखेरीस, हवानामध्ये तैनात असलेले अमेरिकन मुत्सद्दी आणि इतर कर्मचाऱ्यांनी विचित्र आवाज ऐकल्यानंतर विचित्र शारीरिक संवेदना अनुभवल्या आणि नंतर ते आजारी असल्याचे जाणवले. त्यांना मळमळ, तीव्र डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे, झोपेच्या समस्या आणि ऐकण्यात अडचणी येणं, या लक्षणांचा समावेश होता. दरम्यान, क्यूबाने या आजाराबद्दल कोणतीही माहिती नसल्यांचं म्हटलं होतं. तर, अमेरिकेने त्यांच्यावर “सोनिक हल्ला” केल्याचा आरोप केला होता ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता.

एकूण, क्यूबा आणि चीनमधील दोन डझनहून अधिक अमेरिकन मुत्सद्दी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि हवानामधील किमान १४ कॅनेडियन नागरिकांना सारखी लक्षणं आढळली आहेत. दरम्यान, काही जण यातून बरे झाले असून काही जणांवर त्याचे दुष्परीणाम झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होत आहे.

हवाना सिंड्रोमची लक्षणं..

नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्या मते, काही लक्षणे अचानकपणे जाणवतात आणि काही दीर्घकाळ टिकतात.

-अचानक मोठा आवाज ऐकणे (क्लिक करणे, किलबिलाट करणे आणि पिळणे असे आवाज, एका किंवा दोन्ही कानात वेदना, काहींना एका विशिष्ट दिशेने जाण्यास त्रास होतो)

 -श्रवणशक्ती कमी होणे (कानात शिट्टी वाजणे)

-डोक्याच्या आत मजबूत दाब किंवा कंप

-लक्षात ठेवण्यात अडचण

-पाहण्यात अडचण

-मळमळ होणे

-अशक्तपणा, संतुलन जाणे, चक्कर येणे