What is Helmet called in Marathi: दुचाकी चालवणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या डोक्यावर आज हेल्मेट दिसतं. वाहतूक नियमांपासून ते स्वतःच्या सुरक्षिततेपर्यंत हेल्मेट हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. घराबाहेर पडताना चावी, पाकीट आणि हेल्मेट हे तिन्ही जवळ आहेत का, याची खात्री अनेकजण करूनच प्रवासाला सुरुवात करतात. पण, इतक्या वर्षांपासून रोज वापरत असलेल्या या वस्तूचं मराठी नाव काय आहे, असा प्रश्न अचानक विचारला तर अनेकांची गाडी अडते.

आपण सहजपणे हेल्मेट हा इंग्रजी शब्द वापरतो. दुकानात जाताना, मित्रांशी बोलताना किंवा वाहतूक पोलिसांशी संवाद साधतानाही हेल्मेट असाच शब्द तोंडातून निघतो. मात्र, या वस्तूसाठी मराठीत एक सुंदर, अर्थपूर्ण आणि शुद्ध शब्द आहे हे फार कमी लोकांना माहीत असतं.

गेल्या काही वर्षांत इंग्रजी शब्दांचा वापर इतका वाढला आहे की अनेक वस्तूंची मराठी नावं हळूहळू विस्मरणात जात आहेत, त्यामुळे अशा शब्दांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये वाढताना दिसते. सोशल मीडियावरही ‘याला मराठीत काय म्हणतात?’ अशा प्रकारच्या प्रश्नांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. कारण उत्तर माहीत नसल्यामुळे ते जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते.

हेल्मेटची गरज सांगायची तर त्यासाठी फार मोठं स्पष्टीकरण द्यावं लागत नाही. अपघाताच्या वेळी डोक्याचं संरक्षण करण्यासाठी ही वस्तू अत्यंत महत्त्वाची मानली जाते, म्हणूनच वाहतूक नियमांमध्ये हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तज्ज्ञही प्रत्येक प्रवासात हेल्मेटचा वापर करण्याचा सल्ला देतात. पण, सुरक्षिततेचं प्रतीक बनलेल्या या वस्तूचं मराठी नाव मात्र अनेकांच्या ओळखीचं नाही.

विशेष म्हणजे, या शब्दामागे मराठी भाषेचं सौंदर्य आणि अर्थपूर्ण रचना दडलेली आहे. हा शब्द ऐकल्यानंतर त्याचा अर्थ लगेच लक्षात येतो. शब्दाची रचना अशी आहे की तो नेमकं कोणतं काम करतो हे त्यातून स्पष्ट होतं, म्हणूनच हा शब्द केवळ भाषांतर नाही तर त्या वस्तूचं कार्यही सांगणारा आहे.

अनेक शाळांमध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. रोजच्या वापरातील वस्तूंची मराठी नावं माहीत असणं ही केवळ भाषेची आवड नसून, ती आपल्या भाषिक संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. आजच्या पिढीने इंग्रजीसोबत मराठी शब्दांचाही वापर केला तर भाषा अधिक समृद्ध होईल.

आता आपण ज्या उत्तराची इतका वेळ वाट पाहत होतात, त्या हेल्मेटला मराठीत ‘शिरस्त्राण’ म्हणतात.

हा शब्द दोन भागांपासून तयार झाला आहे. ‘शिर’ म्हणजे डोकं आणि ‘त्राण’ म्हणजे संरक्षण. म्हणजेच डोक्याचं संरक्षण करणारी वस्तू, असा त्याचा सरळ आणि अर्थपूर्ण अर्थ होतो; म्हणून हेल्मेटसाठी ‘शिरस्त्राण’ हा शुद्ध आणि समर्पक मराठी शब्द वापरला जातो.

पुढच्या वेळी हेल्मेट हा शब्द वापरताना त्याचं मराठी नाव ‘शिरस्त्राण’ आहे हे नक्की लक्षात ठेवा. कदाचित हा शब्द ऐकून तुमच्या मित्रांनाही आश्चर्य वाटेल आणि मराठी भाषेतील आणखी अशाच रंजक शब्दांचा शोध घेण्याची उत्सुकताही निर्माण होईल.