What Is Hotel Called in Marathi: दैनंदिन आयुष्यात आपण अनेक इंग्रजी शब्द सहजपणे वापरतो. त्यापैकी एक म्हणजे हॉटेल. मित्रांसोबत बाहेर जायचं असेल, कुटुंबासोबत जेवायला जायचं असेल किंवा कुणाला भेटायचं असेल, तर अनेकांच्या तोंडी सहज एकच वाक्य येतं ‘चल, हॉटेलमध्ये जाऊया.’ पण कधी तुम्ही विचार केला आहे का, हॉटेल या शब्दाला मराठीत नेमकं काय म्हणतात?
विशेष म्हणजे हा प्रश्न अनेकांना पडतो. काही जण याचं उत्तर भोजनालय, असं देतात; तर काही जण खानावळ म्हणतात. काहींना वाटतं की, हॉटेल हा शब्दच मराठीत वापरला जातो. त्यामुळे नेमका योग्य शब्द कोणता, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
आजकाल इंग्रजी शब्दांचा वापर इतका वाढला आहे की, अनेक मराठी शब्द हळूहळू आपल्या बोलण्यातून गायब होत आहेत. आपण रोज वापरत असलेल्या अनेक वस्तू, ठिकाणं आणि व्यवहारांना मराठीत सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द आहेत. मात्र, ते फार कमी लोकांच्या लक्षात राहतात. त्यामुळे अशा शब्दांची आठवण करून देणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं.
विशेष म्हणजे सरकारी कार्यालयं, मराठी साहित्य, जुन्या पाट्या आणि शासकीय कागदपत्रांमध्ये आजही अनेक ठिकाणी शुद्ध मराठी शब्दांचा वापर केला जातो. मात्र, बोलताना इंग्रजी शब्द इतके सवयीचे झाले आहेत की, मराठी शब्द माहीत असूनही ते वापरले जात नाहीत.
त्यामागे आणखी एक कारण आहे. हॉटेल या शब्दाचा अर्थ प्रत्येक ठिकाणी सारखा नसतो. काही ठिकाणी हा शब्द जेवण मिळणाऱ्या ठिकाणासाठी वापरला जातो; तर काही ठिकाणी राहण्याची सोय असलेल्या इमारतीसाठीही तोच शब्द वापरला जातो. त्यामुळे मराठीत यासाठी वेगवेगळे शब्द आहेत, हे अनेकांना माहीत नसतं.
भाषातज्ज्ञांच्या मते, मराठी भाषेची ताकद तिच्या समृद्ध शब्दसंपदेत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी अर्थपूर्ण आणि अचूक शब्द मराठीत उपलब्ध आहेत. म्हणूनच आपल्या दैनंदिन बोलण्यात शक्य तितक्या मराठी शब्दांचा वापर केला, तर भाषा अधिक समृद्ध होण्यास मदत होते.
सोशल मीडियावरही अलीकडे अशा शब्दांबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ‘टेबलला मराठीत काय म्हणतात?’, ‘मोबाईलला मराठीत काय म्हणतात?’ अशा प्रश्नांप्रमाणेच ‘हॉटेलला मराठीत काय म्हणतात’ हा प्रश्नही चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी याची वेगवेगळी उत्तरं दिली; मात्र योग्य शब्द फार कमी लोकांना माहीत होता.
आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न…
‘हॉटेल’ला मराठीत काय म्हणतात?
जर जेवण मिळणाऱ्या हॉटेलबद्दल बोलत असाल, तर त्याचा शुद्ध मराठी शब्द ‘उपाहारगृह’ असा आहे. त्याचप्रमाणे भोजनालय हाही योग्य शब्द मानला जातो. शुद्ध मराठी भाषेत ‘भोजन वसतीगृह’ असंही म्हटलं जातं. मात्र, सर्वसाधारणपणे आणि शुद्ध मराठीत ‘उपाहारगृह’ हा शब्द अधिक प्रचलित आणि स्वीकारलेला आहे.
त्यामुळे पुढच्या वेळी कुणी ‘हॉटेलला मराठीत काय म्हणतात’ असा प्रश्न विचारला, तर तुमच्याकडे त्याचं योग्य उत्तर नक्कीच असेल – उपाहारगृह.
