Who Was Lady Macbeth? ‘लेडी मॅकबेथ’ हे नाव जर कुणी घेतलं, तर आपल्याला लगेच त्या नावाचा संदर्भ कदाचित लक्षात येणार नाही. पण जर नुसतं मॅकबेथ म्हटलं तर आपल्या विचारांची पोहोच अगदी सहज जगद्विख्यात साहित्यिक, कथाकार आणि गूढ व्यक्तिमत्व असणाऱ्या विल्यम्स शेक्सपिअरपर्यंत जाऊन पोहोचेल. अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या या विलक्षण लेखकानं लिहिलेली आणि तेव्हाच अजरामर झालेली साहित्यकृती म्हणजे विल्यम्स शेक्सपिअरची शोकांतिका मॅकबेथ! लेडी मॅकबेथ हे शेक्सपिअरच्या याच शोकांतिकेतलं एक पात्र. हे पात्र आणि त्या पात्राची नाटकातली अवस्था हा पुढे संशोधनाचा विषय होईल, याचा अंदाज तेव्हा खुद्द शेक्सपिअरलाही आला नसावा!

तर आत्ताच विल्यम शेक्सपिअरच्या या ‘मॅकबेथ’ शोकांतिकेची आणि त्यातील ‘लेडी मॅकबेथ’ची आठवण काढण्याचं कारण म्हणजे पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंदा बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चक्क ‘लेडी मॅकबेथ’ ची उपमा दिली आहे. कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार व हत्या प्रकरणानंतर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला ममता बॅनर्जी कारणीभूत असल्याचं राज्यपाल आनंदा बोस यांचं म्हणणं आहे. आनंदा बोस यांच्याप्रमाणेच अनेकदा अनेक चर्चांमधून विशिष्ट प्रकारचं वर्तन किंवा टीका-टिप्पणीसाठीही ‘लेडी मॅकबेथ’चं उदाहरण दिलं जातं. पण असं का होतं?

Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Port Blair Centre renames amit shah
Port Blair : मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं, पोर्ट ब्लेअर ‘या’ नावाने ओळखलं जाणार
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
Shivaji Maharaj Samadhi in Raigad: छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुणी शोधली? टिळक की महात्मा फुले?

कोण होती ‘लेडी मॅकबेथ’?

तर विल्यम शेक्सपिअरच्या मॅकबेथ या शोकांतिकेतील मुख्य पात्राचं नाव होतं ‘मॅकबेथ’. ‘लेडी मॅकबेथ’ ही मॅकबेथची पत्नी. लेडी मॅकबेथचं पात्र हे नाटकात सुरुवातीपासूनच प्रचंड गुंतागुंतीचं आणि क्लिष्ट असं रंगवण्यात आलं आहे. पण तरीही नाटकाच्या एकूण परिणामासाठी लेडी मॅकबेथचं तसंच असणं ही त्या शोकांतिकेची गरज होती असं मानलं जातं. लेडी मॅकबेथला सर्वोच्च पदावर जाण्याची महत्त्वाकांक्षा असल्यामुळे ती पती मॅकबेथला स्कॉटलंडचा राजा डंकनची हत्या करण्यासाठी उद्युक्त करते, असं शेक्सपिअरच्या या नाटकात दाखवण्यात आलं आहे.

आपल्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी लेडी मॅकबेथ शक्य ते सर्व मार्ग अनुसरून समोरच्याला तिचं ऐकण्यासाठी भाग पाडत असेल. आपल्या बोलण्यातून समोरच्याचं मतपरिवर्तन करण्याची कला तिच्यात होती. पण डंकनची हत्या झाल्यानंतर तिला प्रचंड अपराधीपणाची भावना वाटू लागते. त्या हत्येचं ओझं तिच्यावर इतकं वाढतं की तिच्यावर त्याचा मानसिक परिणाम होऊ लागतो. आपले हात वारंवार धुण्याचा ती आग्रह करू लागते. जणूकाही डंकनच्या हत्येचं पाप तिला धुवून टाकायचं आहे.

अशा मानसिक अवस्थेत लेडी मॅकबेथ प्रचंड खचून जाते आणि तिचा शेवट हा एक शोकांतिका ठरतो. त्यामुळेच शेक्सपिअरच्या या नाटकाला एक अजरामर शोकांतिका मानलं जातं.

पुस्तकांचा आकार आयताकृतीच का असतो? तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर लगेच जाणून घ्या

लेडी मॅकबेथ इफेक्ट..एक मानसिक अवस्था!

दरम्यान, शेक्सपिअरच्या नाटकातील या अजरामर पात्राच्या मानसिक अवस्थेला मानसोपचार तज्ज्ञांनी ‘लेडी मॅकबेथ इफेक्ट’ असं नाव दिलं. यामध्ये एखाद्या व्यक्तीने काही मोठी चूक किंवा भयंकर अपराध केला असेल, तर त्यामुळे त्याच्या मनात अपराधीपणाची प्रचंड भावना व्यापून राहते. या मानसिक अवस्थेत संबंधित व्यक्ती वारंवार आपले हात धुवत असते. जणूकाही आपण केलेल्या अपराधाचे डाग आपल्या हातावरून धुतले जावेत.