What Is Lift Called in Marathi: आजच्या काळात उंच इमारती आणि अनेक मजली कार्यालये सर्वत्र पाहायला मिळतात. अशा ठिकाणी एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जिन्याबरोबरच एका खास यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. काही सेकंदांत वरच्या मजल्यावर पोहोचवणारी ही सुविधा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे.

मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी गेलात, रुग्णालयात एखाद्या रुग्णाला भेटण्यासाठी गेलात किंवा कार्यालयाच्या इमारतीत कामानिमित्त गेलात, तर ही सुविधा हमखास दिसते. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच जास्त मजले चढणे कठीण असलेल्या व्यक्तींसाठी तर तिचे महत्त्व अधिक आहे.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्याला आपण रोज सहजपणे ‘लिफ्ट’ म्हणतो, त्या शब्दाला मराठीत नेमके काय म्हणतात?

उंच इमारतींमुळे वाढला वापर

पूर्वी इमारती साधारणपणे कमी मजल्यांच्या असायच्या, त्यामुळे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिन्याचा वापर करणे सहज शक्य होते. मात्र, शहरांचा विस्तार झाला, जागेची कमतरता निर्माण झाली आणि उंच इमारती उभ्या राहू लागल्या.

आज अनेक ठिकाणी दहा, वीस किंवा त्याहून अधिक मजल्यांच्या इमारती पाहायला मिळतात. अशा इमारतींमध्ये प्रत्येक वेळी जिन्याने वर-खाली जाणे सोपे नसते, त्यामुळे कमी वेळात आणि कमी श्रमात एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

केवळ मॉल किंवा कार्यालयातच नाही

लिफ्टचा वापर आता केवळ मोठ्या व्यापारी इमारतींपुरता मर्यादित राहिलेला नाही. अनेक गृहसंकुले, रुग्णालये, हॉटेल, शाळा, महाविद्यालये आणि इतर सार्वजनिक इमारतींमध्येही लिफ्ट असते.

विशेषतः रुग्णालयांमध्ये स्ट्रेचर किंवा व्हीलचेअरवरील रुग्णांना एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर नेण्यासाठी लिफ्ट अत्यंत महत्त्वाची ठरते, त्यामुळे आधुनिक शहरांच्या जीवनशैलीत या सुविधेचे स्थान दिवसेंदिवस वाढत आहे.

मराठी भाषेत दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंसाठी सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द आहेत. मात्र, इंग्रजी भाषेचा वाढता वापर आणि बदलती जीवनशैली यामुळे काही शब्द व्यवहारातून हळूहळू दूर गेले आहेत.

याच कारणामुळे अनेकांना आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंची मराठी नावे माहीत नसतात. विशेष म्हणजे, एखाद्या वस्तूचे मराठी नाव समोर आले की ते ऐकून अनेकांना आश्चर्यही वाटते.

याच मालिकेतील हा शब्द आहे. घराच्या किंवा इमारतीच्या कित्येक मजल्यांवर सहज पोहोचवणारी ही सुविधा आपण दिवसातून अनेकदा वापरतो. तिच्याशिवाय उंच इमारतीतील दैनंदिन व्यवहाराची कल्पनाही करणे आज अनेकांना कठीण वाटेल.

मग लिफ्टला मराठीत काय म्हणतात?

आपण दिवसभरात अनेक वेळा वापरत असलेल्या या सुविधेला मराठीत कोणता शब्द आहे, याचा विचार केला तर अनेकांना त्याचे उत्तर लगेच देता येणार नाही.

इंग्रजीतील ‘लिफ्ट’ या शब्दासाठी मराठीत ‘उद्वाहक’ हा शब्द वापरला जातो.

‘उद्वाहक’ हा शब्द त्याच्या कार्यावरून तयार झाला आहे. एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला एका ठिकाणाहून दुसऱ्या, विशेषतः वरच्या ठिकाणी नेणारे यंत्र म्हणजे उद्वाहक.

म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या इमारतीत गेलात आणि वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टसमोर उभे राहिलात, तेव्हा लक्षात ठेवा-लिफ्टला मराठीत ‘उद्वाहक’ असे म्हणतात.

दैनंदिन जीवनात आपण अनेक इंग्रजी शब्द सहजपणे वापरतो. मात्र, त्यामागे असलेले मराठी शब्द जाणून घेतले की आपली भाषा आणखी समृद्ध होते, त्यामुळे रोजच्या वापरातील अशा शब्दांचे मराठी अर्थ जाणून घेणे नक्कीच रंजक ठरते.