scorecardresearch

घरातील TV किती अंतरावरुन पाहायला हवा? जाणून घ्या

अनेकजण घरं छोटे असले तरी मोठा टीव्ही खरेदी करतात, पण यामुळे तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतो.

What is the best distance from TV size to viewing read
टीव्ही किती अंतरावरून पाहावा (संग्रहित)

पूर्वीच्या काळी लोकांकडे मनोरंजनासाठी पुरेशी साधने नव्हती. त्यानंतर टीव्ही आला लोकांचे घरी बसूनचं मनोरंजन होऊ लागले. खेळांची जागा आता अनेक टीव्ही शोने घेतली. पण काळ बदलला आणि लोकांचे छंदही बदलले. यात बजेटनुसार, लोकं आपल्या आवडीनुसार टीव्ही खरेदी करू लागले. या अनेकजण मोठ्या आकाराच्या टीव्हीला पसंती देत आहेत. पण अनेकदा आपण ऐकलं असेल की, घराच्या आकारानुसार आपण टीव्ही खरेदी केला पाहिजे. तसेच ठरावीक अंतरावरूनचं टीव्ही पाहावा जेणेकरुन आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होणार नाही. पण टीव्ही किती अंतरावरुन पाहायला हवा याचे खरं उत्तर जाणू घेऊ…

घरात टीव्ही लावताना आपल्याकडून अनेकदा चूका होतात. घरात जागा नसतानाही आपण मोठ्या आकाराचे टीव्ही लावतो. परंतु तुम्हाला माहित आहे का, टीव्हीच्या आकारानुसार, तो पाहण्यासाठी पुरेसे अंतर ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचा आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

घरात २४ इंच स्क्रीनचा टीव्ही असेल तर तो किती अंतरावर पाहावा?

जर तुमच्या घरात २४ इंचाचा टीव्ही असेस तर टीव्ही पाहण्यासाठी तुमच्यात आणि टीव्हीमध्ये किमान ३ फूट अंतर असले पाहिजे. पण असं नाही की तुम्ही खूप लांबून टीव्ही बघितला पाहिजे. टीव्ही पाहण्यासाठी जास्तीत जास्त अंतर खूप महत्त्वाचे आहे. २४ इंच टीव्ही पाहण्यासाठी कमाल अंतर ५ फुटांपेक्षा जास्त नसावे.

तुमच्या घरात ३२ इंचाचा टीव्ही असेल तर तुमचा टीव्ही कमीत कमी ६ फूट आणि जास्तीत जास्त ७ फूट अंतरावरून पाहावा. तुम्ही टीव्ही जेव्हा खूप जवळून बघता तेव्हा त्यातील पिक्सेल आपल्याला लहान बॉक्सच्या रुपात दिसतात. यामुळे चित्र स्पष्ट दिसणार नाहीत. याशिवाय कमी अंतरावरून टीव्ही बघितल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे डोळ्यांचे अधिक नुकसान होऊ शकते.

जर तुमच्या घरात ४३ इंचाचा टीव्ही असेल तर तुम्ही तो कमीत कमी ६ फूट आणि जास्तीत जास्त ८ फूट अंतरावरून पाहावा. जर तुम्हाला मोठ्या स्क्रीनचा टीव्ही आवडत असेल तर तुम्ही घरात ५० ते ५५ इंच स्क्रीन आकाराचा टीव्ही घेऊ शकता, ही टीव्ही तुम्ही १० फुटांपेक्षा जास्त जवळ पाहू नये.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 14:22 IST

संबंधित बातम्या