Conductor Meaning in Marathi: दररोज लाखो लोक बसने प्रवास करतात. बसमध्ये चढताच आपलं पहिलं वाक्य असतं, “कंडक्टर, एक तिकीट द्या.” इतक्या सहजपणे हा शब्द आपण वापरतो की, तो परदेशी भाषेतील आहे की मराठी, याचाही विचार अनेकदा करत नाही.
पण तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का, कंडक्टरला शुद्ध मराठीत काय म्हणतात?
हा प्रश्न ऐकताच अनेक जण क्षणभर विचारात पडतात. काही जण ‘तिकीटवाला’ म्हणतात; तर काही ‘बसमास्तर’ असं उत्तर देतात. पण योग्य शब्द कोणता? हे फार कमी लोकांना माहीत असतं.
मराठी भाषा ही समृद्ध आणि सुंदर भाषा मानली जाते. अनेक इंग्रजी शब्द आपण नकळत रोजच्या बोलण्यात वापरतो. डॉक्टर, ड्रायव्हर, कंडक्टर, ऑफिस, स्टेशन, कॉलेज, असे कितीतरी शब्द आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मराठी पर्यायांचा वापर हळूहळू कमी होत चालला आहे.
बसमध्ये तिकीट देणारी व्यक्ती फक्त पैसे घेते, एवढंच तिचं काम नसतं. प्रवाशांना योग्य तिकीट देणे, प्रवासाची माहिती सांगणे, प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेणे, बसमध्ये शिस्त राखण्यास मदत करणे, तसेच चालकाला आवश्यक माहिती देणे, अशी अनेक जबाबदाऱ्या ती पार पाडत असते.
पूर्वी शाळांमध्ये आणि सरकारी कार्यालयांमध्ये अनेक इंग्रजी शब्दांचे मराठी पर्याय शिकवले जात होते. त्यामुळे अनेकांना अशा शब्दांची माहिती होती. मात्र, आता इंग्रजीचा वापर वाढल्यामुळे हे शब्द हळूहळू विस्मरणात जात आहेत.
आजही अनेक सरकारी कागदपत्रे, सूचना फलक आणि परिवहन विभागाच्या काही अधिकृत कागदपत्रांमध्ये इंग्रजी शब्दांसोबत त्यांचे मराठी शब्दही वापरले जातात. पण दैनंदिन संभाषणात मात्र आपण पुन्हा इंग्रजी शब्दांचाच आधार घेतो.
विशेष म्हणजे मराठी भाषेवर प्रेम करणारे अनेक जण अशा शब्दांचा शोध घेत असतात. एखाद्या साध्या शब्दाचा शुद्ध मराठी पर्याय समजला की, तो पुढे इतरांनाही सांगण्याची उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे अशा विषयांवरील माहिती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पुढे पाठवली जाते.
आता तुम्हालाही उत्सुकता लागली असेल की, कंडक्टरचा शुद्ध मराठी शब्द नेमका कोणता?
याचं उत्तर अनेकांना आश्चर्यचकित करू शकतं.
कंडक्टरला मराठीत काय म्हणतात?
कंडक्टरचा शुद्ध मराठी शब्द म्हणजे ‘वाहक’.
‘वाहक’ म्हणजे प्रवाशांना वाहतूक सेवेत मदत करणारी, तिकीट देणारी आणि प्रवास व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासह अनेक शासकीय संदर्भांमध्ये ‘वाहक’ शब्द अधिकृतपणे वापरला जातो.
यापुढे बसमध्ये तिकीट देणाऱ्या व्यक्तीला ‘कंडक्टर’ऐवजी ‘वाहक’ म्हणाल, तर तुम्ही चक्क शुद्ध आणि समृद्ध मराठीचा वापर करत आहात, असं म्हणायला हरकत नाही.
