बहुतांश सर्वच घरात जेवण बनवण्यासाठी सिलेंडरचा वापर केला जातो. नवा सिलेंडर घेताना आपण त्याचे सिल चेक करतो, काहीजण तर तो उचलून जड आहे ना याचीही खात्री करुन घेतात. पण सिलेंडर घेताना आणखी एक गोष्ट तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते. ती गोष्ट म्हणजे त्यावर असणारे अंक.

सिलेंडरवर वेगवेगळे अंक लिहलेले आपण नेहमीच पाहतो. पण त्याचा अर्थ काय? त्यामधून सिलेंडरबाबत कोणती माहिती सांगण्यात आली आहे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या अंकांचा अर्थ अनेकांना माहित नसतो. पण प्रत्येकाने सुरक्षेसाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे. काय असतो या अंकांचा अर्थ जाणून घ्या.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

आणखी वाचा: कारच्या मागील काचेवर रेषा का असतात? जाणून घ्या यामागचे महत्त्वाचे कारण

सिलेंडरवर असणाऱ्या अंकांचा अर्थ:
सिलेंडरच्या वरच्या भागावर अक्षर आणि अंक लिहिलेले असतात. यामध्ये त्या सिलेंडरची एक्सपायरी डेट कोडमध्ये देण्यात आलेली असते. सिलेंडरवर तुम्ही A, B, C D ही अक्षरं आणि त्यापुढे अंक लिहलेले पाहिले असतील. या अक्षरांचा अर्थ महिन्यांशी जोडलेला आहे. A म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. B म्हणजे एप्रिल, मे, जून. C म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि D म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर.

अक्षरांपुढे अंक लिहलेले तुम्ही पाहिले असतील. उदा. B 22 किंवा D 25 यातील अंक म्हणजे तो सिलेंडर एक्सपायर होण्याचे वर्ष असते. B 22 म्हणजे २०२२ मध्ये एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये हा सिलेंडर एक्सपायर होईल. तर D 25 म्हणजे २०२५ च्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांमध्ये हा सिलेंडर एक्सपायर होईल.

आणखी वाचा: गाडीचे टायर काळ्या रंगाचे का असतात? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण

अशाप्रकारे सिलेंडरवर देण्यात आलेल्या अंकांचा अर्थ त्यांच्या एक्सपायरी डेटशी जोडलेला असतो. कधीही सिलेंडर घेताना हे अंक तपासल्याशिवाय सिलेंडर विकत घेऊ नये. जर एखाद्यावेळी तारीख निघून गेलेली आहे असा सिलेंडर आला तर तो परत करावा आणि त्यांची नोंद घेण्यास सांगावे. तारीख निघून गेलेला सिलेंडर धोकादायक असु शकतो. त्यामुळे सिलेंडरवरील तारीख तपासणे आवश्यक आहे.