Do You Know the Marathi Words for Chicken and Mutton: आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी इंग्रजी शब्द सहज वापरतो. विशेषतः खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये तर इंग्रजी शब्द इतके मिसळले गेले आहेत की, अनेकांना त्या पदार्थांचे शुद्ध मराठी शब्द माहितीही नसतात. ‘चिकन’, ‘मटण’, ‘बर्गर’, ‘पिझ्झा’ असे शब्द आता इतके सर्रास वापरले जातात की, त्यांच्या मराठी नावांचा विचारसुद्धा फार कमी लोक करतात. पण, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का आपण आवडीने खाणाऱ्या चिकन आणि मटणाला मराठीत नेमकं काय म्हणतात?

हा प्रश्न ऐकायला साधा वाटतो, पण सोशल मीडियावर सध्या याच विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक जण वेगवेगळी उत्तरं देत आहेत. कुणी म्हणतं चिकन म्हणजे कोंबडी, तर कुणी वेगळाच शब्द सांगतं. मटणाबाबतही तसंच चित्र दिसत आहे, त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

मराठी भाषा ही अतिशय समृद्ध आणि गोड भाषा मानली जाते. जुन्या काळी घराघरांत शुद्ध मराठी शब्द वापरले जात होते. मात्र, काळ बदलला तसं इंग्रजी शब्दांचं प्रमाण वाढत गेलं. विशेषतः शहरांमध्ये मराठीपेक्षा इंग्रजी शब्द वापरण्याकडे लोकांचा अधिक कल दिसू लागला, त्यामुळे अनेक पारंपरिक शब्द मागे पडले.

विशेष म्हणजे आजच्या पिढीतील अनेक मुलांना भाज्या, फळं, पदार्थ किंवा प्राण्यांची मराठीतली नावं माहिती नसतात. शाळांमध्ये इंग्रजी माध्यम वाढल्यामुळे मातृभाषेतील शब्द हळूहळू विस्मरणात जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच ‘चिकन आणि मटणाला मराठीत काय म्हणतात?’ हा प्रश्न लोकांना अधिक उत्सुकता निर्माण करणारा ठरत आहे.

दरम्यान, काही भाषातज्ज्ञांच्या मते, एखाद्या पदार्थाचं नाव आणि त्या प्राण्याचं नाव यात फरक असतो, त्यामुळे अनेकदा लोक गोंधळून जातात. उदाहरणार्थ, आपण जेव्हा ‘चिकन’ म्हणतो, तेव्हा त्याचा संबंध थेट कोंबडीशी जोडला जातो. पण, जेवणात तयार झालेल्या पदार्थाला लोक पुन्हा ‘चिकन’ असंच म्हणतात. अगदी हॉटेलांमध्येही मराठी शब्दांपेक्षा इंग्रजी नावांनाच अधिक प्राधान्य दिलं जातं.

हेही वाचा
‘चिकन’ आणि ‘मटण’ला मराठीत काय म्हणतात? ९०% लोकांना माहितीच नाही उत्तर

ग्रामीण भागात मात्र अजूनही काही ठिकाणी जुने मराठी शब्द ऐकायला मिळतात. गावाकडील वयोवृद्ध मंडळी बोलताना अस्सल मराठी शब्द वापरतात, त्यामुळे त्यांची भाषा ऐकताना वेगळाच गोडवा जाणवतो. आजच्या तरुणांनीही असे शब्द जाणून घेण्याची गरज असल्याचं मत अनेक जण व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर सध्या या प्रश्नावर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी मजेशीर उत्तरं दिली आहेत तर काहींनी शुद्ध मराठी शब्द शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे हा विषय आणखी चर्चेत आला आहे.

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चिकन आणि मटणला मराठीत नेमकं काय म्हणतात?

तर ‘चिकन’ला मराठीत सामान्यतः ‘कोंबडीचे मांस’ असे म्हटले जाते, तर ‘मटण’ला मराठीत ‘बकरीचे मांस’ किंवा ‘शेळीचे मांस’ असे संबोधले जाते. विशेष म्हणजे, ‘मटण’ हा शब्द स्वतः मराठीत इतका रूढ झाला आहे की, अनेकांना तो परभाषेतील शब्द आहे हेही माहिती नसतं.