what thing necessary to get a facebook varified badge | Loksatta

फेसबुक व्हेरिफाइड बॅज हवा आहे? मग ‘या’ बाबींची पूर्तता करणे गरजेचे, जाणून घ्या प्रक्रिया

ट्विटरप्रमाणे फेसबुकवर देखील ब्ल्यू टीक उपलब्ध आहे. फरक इतकाच की ही सेवा मोफत आहे, मात्र त्यासाठी काही बाबी पूर्ण असाव्या लागतात. याबाबत आपण जाणून घेऊया.

फेसबुक व्हेरिफाइड बॅज हवा आहे? मग ‘या’ बाबींची पूर्तता करणे गरजेचे, जाणून घ्या प्रक्रिया
(pic credit – pixabay)

अलीकडे इटरनेटवर युजर व्हेरिफिकेशनबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. ट्विटरने सेलिब्रिटी, सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांचे खरे खाते दर्शवण्यासाठी ब्ल्यू टीक हा पर्याय उपलब्ध केला होता. नंतर तो सर्वांसाठी शुल्कासह उपलब्ध करण्यात आला. त्यानंतर ट्विटरवर बनावट खातेधारकांचा सुळसुळाट दिसून आला. यामुळे मस्क यांनी ही सेवा काही काळासाठी स्थगितदेखील केली. त्यामुळे ब्ल्यू टीक, युजर व्हेरिफिकेशन हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले. ट्विटरप्रमाणे फेसबुकवर देखील ब्ल्यू टीक उपलब्ध आहे. फरक इतकाच की ही सेवा मोफत आहे, मात्र त्यासाठी काही बाबी पूर्ण असाव्या लागतात. याबाबत आपण जाणून घेऊया.

सत्यापित बॅज तुमच्या युजर्सना तुमची प्रोफाइल खरी असून ती बनावट नसल्याचे सांगते. त्यामुळे या ब्ल्यू टीक बॅजचे महत्व आहे. फेसबुककडून सत्यापित झाल्यास ब्रँडची विश्वासार्हता वाढवता येते. या व्यतिरिक्त फेसबुक बॅज मिळाल्यास सर्च निकालांमध्ये तुमची प्रोफाईल सर्वात वर दिसून येते.

(‘CHARACTER LIMIT’ १ हजार असावी, युजरने सूचवलेल्या पर्यायावर मस्क म्हणाले, त्यावर..)

व्हेरिफाइड बॅजसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत?

फेसबुक पेज किंवा प्रोफाइल हे सार्वजनिक हिताचे आहे की नाही आणि ते सत्यापणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करत आहेत की नाही हे तपासताना फेसबुक अनेक बाबी विचारात घेते. सेवा अटी आणि फेसबुक कम्युनिटीच्या मानकांचे पालन करण्यासह पेजेस आणि प्रोफाईल्सने पुढील बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे.

१) खरेपणा – प्रोफाईल खरी व्यक्ती, व्यवसाय किंवा ब्रँडचे प्रतिनिधत्व करत असावी.

२) अनोखे – प्रोफाईल व्यक्ती किंवा कंपनीची एकमेव प्रतिनिधी असावी. भाषा विशिष्ठ पेजेस आणि प्रोफाईल वगळता प्रति व्यक्ती किंवा कंपनी केवळ एक पेज किंवा प्रोफाईल सत्यापित होऊ शकते. सामान्य स्वारस्य असलेले पेजेस आणि प्रोफाइल्स फेसबुकद्वारे सत्यापित केले जात नाहीत.

३) फ्रोफाईलमध्ये परिचय, एक पेज किंवा प्रोफाईल पिक्चर आणि अलीकडील क्रियाकलापावर आधारीत किमान एक पोस्ट असावी.

४) प्रसिद्ध व्यक्ती – प्रोफाईल प्रस्थापित, वारंवार शोधण्यात येणाऱ्या व्यक्तीची असावी. पेजेस आणि प्रोफाइलचे पुनरावलोकन करताना अनेक बातम्यांचे स्त्रोत विचारात घेतले जातात. परंतु, प्रचारात्मक किंवा पेड कंटेंटला स्त्रोत मानले जात नाही.

(मस्तच! आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये स्वत:लाच पाठवता येईल मेसेज, तयार करता येईल नोट्स, ‘असे’ वापरा नवीन फीचर)

सत्यापनासाठी फेसबुक किती वेळ घेते?

फेसबुकला तुमचा अर्ज मिळाल्यावर ते त्याचे पुनरावलोकन करतील आणि ते मंजूर करतील किंवा नाकारतील. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 48 तास ते 45 दिवस लागू शकतात.

तुम्ही फेसबुक व्हेरिफाइड बॅज विकत घेऊ शकता का?

व्हेरिफिकेशन बॅज हे फेसबुककडून मोफत दिल्या जाते.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 19:47 IST
Next Story
यंदाच्या हिवाळ्यात कारने लॉंग ट्रिपचा किंवा लॉंग ड्राईव्हचा प्लॅन आखताय, मग जाणून घ्या रेडिएटर फ्लश का आवश्यक आहे?