scorecardresearch

Premium

Indian Railway: ट्रेनचे तिकीट हरवले तर काळजी करु नका; जाणून घ्या फक्त ‘हा’ नियम

भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुमचे तिकीट प्रवासादरम्यान हरवले तर घाबरू नका, तुम्ही फक्त रेल्वेचे हे नियम जाणून घ्या

what to do if you lose confirmed train ticket Lost your train ticket Indian Railways providing alternate arrangement Know all details here
ट्रेनचे तिकीट हरवले तर काळजी करु नका; जाणून घ्या फक्त 'हा' नियम (संग्रहित फोटो)

रेल्वेने प्रवास करणे आरामदायी असले तरी कधी कधी प्रवासांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून अनेक सुविधा दिल्या आहेत. यात तुम्हाला घरी बसून आरामात तिकीट बुक करु शकता. पण तरीही प्लॅटफॉर्मवरील तिकीट काउंटरवरुन तिकीट खरेदी करणारे बहुतांश लोक आहेत. अशा परिस्थितीत जर तुमचे रेल्वे तिकीट प्रवासादरम्यान हरवले तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही. याबाबत आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेचे नियम सांगणार आहोत.

ट्रेनचे तिकीट हरवले तर काय करावे?

प्रवासापूर्वी जर तुमचे ट्रेनचे तिकीट हरवले तर तुम्ही तिकीट तपासकाकडून नवीन डुप्लिकेट तिकीट मिळवू शकता. मात्र यासाठी तुम्हाला १०० रुपये दंड भरावा लागू शकतो. तिकीट हरवल्यानंतर तुम्ही ताबडतोब तिकीट तपासकाशी संपर्क साधावा आणि संपूर्ण माहिती दिल्यानंतर तिकीट तपासक तुमच्यासाठी नवीन तिकीट बनवू शकेल. जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल आणि तुमचे तिकीट हरवले तर तुम्ही आयआरसीटीसी अॅपवर जाऊन TTE ला कोच आणि बर्थचा मेसेज दाखवू शकता. यामु ळे त्यांना कन्फर्मेशनही मिळेल.

Ticket Checking Staff Caught 2693 Travellers Caught Without Tickets At Andheri Railway Station Mumbai Print News video viral
VIDEO: बापरे! अंधेरी स्टेशनवर टीसींची फौज; २४ तासात विनातिकीट प्रवाशांकडून ७ लाख रुपये दंड वसूल
Snatching Of lady Purse In Running Train Old shocking Video Viral
रेल्वेत प्रवास करताना रात्री दरवाजा उघडा ठेवू नका; महिलेसोबत घडली धक्कादायक घटना, पाहा व्हायरल Video
dombivli railway station, people walking on the railway track
डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे मार्गातून प्रवाशांची ये-जा
railway Employee sweepers dumped waste garbage on railway track from running train coach watch viral video
लज्जास्पद! धावत्या रेल्वेतून कर्मचाऱ्याने थेट रुळावर फेकला कचरा; Viral Video पाहून भडकले लोक

याशिवाय जेव्हा तुम्ही ट्रेनचे तिकीट ऑनलाईन बुक करता तेव्हा ते तिकीट तुमच्या मोबाईल नंबर आणि मेल आयडीवर पाठवले जाते. तुमच्या मोबाईलवर PNR कन्फर्मेशनचा मेसेज देखील येतो. तो तुम्ही TTE ला दाखवू शकता. यावरुन कळेल की, तुम्ही ज्या सीटवर बसला आहात ती सीट किंवा बर्थ तुम्ही बुक केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What to do if you lose confirmed train ticket lost your train ticket indian railways providing alternate arrangement know all details here sjr

First published on: 24-09-2023 at 20:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×