छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत होते, आहेत आणि राहतील. स्वराज्याची निर्मिती महाराजांनी केली. त्यांचा आदर्श आजही डोळ्यांसमोर ठेवून अनेक लोक प्रेरित होतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आठवावा प्रताप हे आजही बोललं जातं. शिवचरित्रातून प्रेरणा घेतली जाते. त्यांच्या आयुष्यावर आत्तापर्यंत अनेक कादंबऱ्या, नाटकं, चित्रपटही आले आहेत. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज हे म्हटलं जाण्यापूर्वी काय म्हटलं जात असे? इतिहासकार आणि संतसाहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी याचं उत्तर दिलं आहे.

सदानंद मोरे काय म्हणतात?

“शिवाजी महाराज जेव्हा महाराष्ट्रात राज्य करु लागले तेव्हा त्यांचे मावळे, त्यांचे सरदार, त्यांच्या प्रशासनातले लोक, सैन्यातले सैनिक त्यांना काय म्हणत होते? हे सगळे त्यांना साहेब म्हणत होते. साहेब हा शब्द सत्तावाचक, अधिकारवाचक आहे. साहेब हा शब्द पर्शियन भाषेमुळे आपल्या भाषेत आला आणि रुढ झाला. पर्शियन बोलणाऱ्यांचं राज्य गेलं, मराठी बोलणाऱ्यांचं राज्य आलं तेदेखील गेलं. त्यानंतर इंग्रज आले, म्हणजेच इंग्रजी बोलणाऱ्याचं राज्य आलं. तरीही साहेब हा शब्द कायम राहिला. आपण पुढे इंग्रजांसाठी साहेब शब्द वापरला. हा शब्द मुळात इंग्रजांसाठी नव्हता. शिवाजी महाराजांना हे वाटू लागलं की आपल्याला आपल्या भाषेतले शब्द हवेत. सत्तावाचक शब्द असले पाहिजेत हे त्यांना वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी सुरुवात केली साहेब या शब्दापासून. त्याला पर्यायी शब्द आणला महाराज. त्यामुळे असं ठरलं की छत्रपती शिवरायांना साहेब शब्दाऐवजी महाराज म्हणायचं. महाराज शब्दाचा उपयोग करायचा हे ठरलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव त्या उपाधीसह रुढ झालं”

kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
kolhapur lok sabha seat, Sanjay Mandlik, Clarifies Controversial, against shahu maharaj, opponents deliberately distorted statement, shahu maharaj adopted statement, kolhapur shahu maharaj, shivsena, congress,
माफी मागायचा प्रश्नच नाही; दत्तक वारस विरोधातील उग्र जनआंदोलनाचा इतिहास जाणून घ्यावा – संजय मंडलिक
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
Udayanraje Delhi
शहांनी बडदास्त ठेवलेले उदयनराजे आता भेटीसाठीही तरसले!

छत्रपती शिवाजी महाराज की जय! हे नाव नुसतं घेतलं तरीही आपल्या तोंडून जय हा शब्द आपसूकच बाहेर पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांना ‘महाराज’ कसं म्हटलं जाऊ लागलं हे संतसाहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी सांगितलं आहे. साहेब हा शब्द छत्रपती शिवरायांसाठी संबोधला जात असे. पण तुम्हाला ठाऊक आहे का साहेब हा शब्द मराठीत कसा आला?

साहेब शब्द मराठीत कसा आला?

साहेब हा शब्द मराठी भाषेत पर्शियन किंवा फारसी भाषेतून आला. साहिब या मूळ शब्दाचं ते रुप आहे. साहेब या शब्दाचा अर्थ होतो स्वामी, धनी. हा शब्द छत्रपतींसाठी आणि त्यानंतरच्या काळात पेशव्यांसाठी वापरला गेला. बखरींमध्ये हा शब्द वाचायला मिळतो. इंग्रजांसाठी साहेब शब्द हा एका अरबी माणसाने सुरुवातीला वापरला आणि तेव्हापासून साहेब म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर इंग्रज येतात. सध्याच्या घडीला हा शब्द विविध कंपन्या, आस्थापनांमध्ये वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांसाठी वापरला जातो. सदानंद कदम लिखित कहाणी शब्दांची, मराठी भाषेच्या जडणघडणीची या पुस्तकात हा उल्लेख करण्यात आला आहे.