scorecardresearch

आर्थिक रसातळाला गेलेल्या पाकिस्तानमध्ये कोणता स्मार्टफोन वापरतात माहितेय कां? जाणून घ्या

पाकिस्तानमध्ये किती लोकं आयफोन वापरतात, कोणत्या कंपनीच्या फोनची सर्वाधिक विक्री होते, चला तर जाणून घेऊया.

Pakistan Smartphone
पाकिस्तानात 'या' कंपनीच्या फोनची होतेय सर्वाधिक विक्री (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Pakistan Mobile Market: श्रीलंकेपाठोपाठ पाकिस्तानची अर्थव्यवस्था देखील संकटात सापडली आहे. महागाई आमि परकीय चलनात झालेल्या घटमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था (Pakistan Economic Crisis) डबघाईला आली आहे. पण हा आज आपला विषय नसून आपला विषय दुसरा आहे. तुम्हाला माहितेय का भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानात कोणत्या कंपनीचा स्मार्टफोन वापरला जातो आणि या देशात आयफोनप्रेमी किती आहेत, क्वचितच लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित असेल, चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर..

पाकिस्तानात ‘या’ कंपनीच्या फोनची होतेय सर्वाधिक विक्री

स्टेट काउंटरच्या अहवालानुसार, डिसेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ पर्यंत, सॅमसंगचा पाकिस्तानमधील मोबाईल विक्रेत्याचा बाजारातील हिस्सा सुमारे १९.७३ टक्के आहे. तर विवोचा १४.६४ टक्के, ओप्पोचा १३.९४ टक्के आणि इंफीनिक्सचा १३.८४ टक्के आहे. त्यानुसार, गेल्या वर्षी सॅमसंगचे सर्वाधिक मोबाईल पाकिस्तानमधील लोकांनी खरेदी केले होते. हा अहवाल स्टेट काउंटरवर आधारित आहे जो जागतिक आकडेवारीची नोंद करतो.

(हे ही वाचा : Samsung Galaxy S23 Series १ फेब्रुवारीला करणार मार्केटमध्ये एंट्री, ‘हे’ असतील तगडे फीचर्स )

पाकिस्तानात किती लोक आयफोन वापरतात?

स्टेट काउंटरच्या अहवालानुसार, जानेवारी ते डिसेंबर २०२२ दरम्यान, iOS ऑपरेटिंग सिस्टमचा बाजार हिस्सा ४.९३ टक्के आहे, तर Android चा बाजार हिस्सा ९४.५५ टक्के आहे. अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये सुमारे ६ टक्के लोक आयफोन वापरतात.

पाकिस्तानमध्ये बजेट स्मार्टफोनची विक्री होते सर्वाधिक

पाकिस्तानमध्ये बजेट स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यामुळेच येथे सॅमसंग, विवो, ओप्पो आणि इंफीनिक्स सारख्या ब्रँडचा मार्केट शेअर जास्त आहे. वास्तविक, बजेट स्मार्टफोन्सची खासियत अशी आहे की, या कमी किमतीत लोकांना प्रीमियम किंवा फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये सर्व फीचर्स मिळतात. यामुळे लोकांना ते खरेदी करायला आवडते.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 16:12 IST