Compensation for Natural Death in Trains : गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय रेल्वे प्रवाशांना सेवा देत आहे. भारतीय रेल्वेचं जाळं संपूर्ण देशभरात पसरलं आहे. महत्त्वाच्या शहरांमधून गावोगावी जाण्यासाठी सामान्य लोक रेल्वेने प्रवास करतात. एकंदर रेल्वे हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज कोट्यवधी प्रवासी भारतीय रेल्वेद्वारे भारतात रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांसाठी हजारो गाड्या रोज रुळावरून धावतात, त्यामुळे इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत रेल्वे प्रवास खूप आरामदायी आणि सोयीस्कर आहे. म्हणूनच भारतात जेव्हा जेव्हा कोणाला लांबचा प्रवास करावा लागतो, त्यावेळी बहुतेक लोकांची पहिली पसंती रेल्वेलाच असते.

रेल्वे प्रवास हा खूप सुरक्षित प्रवास मानला जातो. पण, अनेक वेळा गाड्यांमध्ये अपघाताच्या घटनाही घडतात, ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रेल्वेने प्रवास करताना रेल्वेच्या नियमांबाबत माहीत असणे आवश्यक आहे. रेल्वे प्रवास तसा सुरक्षित आहे, पण अनेकदा रेल्वे अपघात होतात. रेल्वे अपघातामध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर भारतीय रेल्वेकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबास भरपाई दिली जाते. पण, जर एखाद्याचा ट्रेनमध्ये नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याला रेल्वेकडून भरपाई मिळते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत भारतीय रेल्वेचे काय नियम आहेत हे जाणून घेऊ या

हेही वाचा – जॅक्स पेंग्विन ते व्होल्कॅनो रॅबिट; धगधगत्या ज्वालामुखीच्या प्रदेशात जगतात हे १० प्राणी

रेल्वे प्रवासात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मिळते का?

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने काही नियम बनवले आहेत. रेल्वेच्या नियमानुसार, जर एखाद्याचा ट्रेनमध्ये मृत्यू झाला आणि त्यासाठी भारतीय रेल्वे जबाबदार असेल अशा परिस्थितीत रेल्वेकडून भरपाई दिली जाते. म्हणून जर एखादा प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करत असेल आणि कोणत्याही कारणाशिवाय प्रवासादरम्यान त्याच्या सीटवर बसलेले असताना त्या प्रवाशाचा नैसर्गिक मृत्यू झाला किंवा तो एखाद्या आजाराने ग्रस्त आहे, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाल्यास अशा परिस्थितीमध्ये भारतीय रेल्वेकडून कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही.

हेही वाचा – म्युच्युअल फंडामध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या, SIP कशी सुरू करावी?

याशिवाय जर घाईघाईने धावत चालती रेल्वे पकडताना प्रवाशाचा अपघात झाल्यास किंवा प्रवाशाच्या चुकीमुळे त्याचा मृत्यू झाल्यासदेखील भारतीय रेल्वेकडून कोणतीही भरपाई दिली जात नाही. जर भारतीय रेल्वेची चूक असेल आणि त्यामुळे जर एखाद्या प्रवाशाने जीव गमावल्यास भारतीय रेल्वेला नुकसान भरपाई द्यावी लागते. यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्यानंतर नुकसान भरपाई मिळते.

Story img Loader