scorecardresearch

Premium

भारतातच सर्व पंख्यांना तीन पाती का असतात? स्टाईल नाही ‘हे’ आहे खरं लॉजिक, डिझाईन जराही बदललं तर..

Did You Know: तुम्ही कधी नीट निरीक्षण केले आहे का आपल्याकडे पंख्याला तीन पाती असतात, असं का? फॅशन, स्टाईल, मर्जी इतकाच यामागे हेतू नसून याचे एक खास कारण सुद्धा आहे

Why All Indian Ceiling Fans Have Three Blades And Foreign Fans Have Four Blades Important Logic Behind Summer Facts
भारतात सर्व पंख्यांना तीनच पाती का असतात? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Why There Are Only 3 Blades In Ceiling Fans: गुलाबी थंडीचा ओघ कमी होऊन आता हळूहळू हवामानाचा पारा वाढू लागला आहे. मुंबईत तर आता दुपारी अगदी मे महिन्याप्रमाणे उन्हाचा तडाखा अनुभवता येतो. यंदाची थंडी पाहता उन्हाळा सुद्धा कडक असणार असे अंदाज आहेत. आता उन्हाळा सर्वांसाठी सारखा असला तरी त्याचा सामना करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी एसी असेलच असं नाही. पण अगदी मध्यमवर्गीयांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांकडे पंखा मात्र नक्कीच असतो.

तुम्ही कधी नीट निरीक्षण केले आहे का आपल्याकडे पंख्याला तीन पाती असतात पण हेच इंग्रजी वेबसिरीज किंवा ब्रिटिशकालीन बांधकाम केलेल्या भागांमध्ये चार पाती असणारे पंखे असतात. असं का हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का? फॅशन, स्टाईल, मर्जी इतकाच यामागे हेतू नसून याचे एक खास कारण सुद्धा आहे, ते काय हे आज आपण जाणून घेऊयात..

Have moles on your face what will you do
Health Special: अंगावर तीळ आहेत? काय कराल?
Infosys Narayana Murthy Consumer Brand
Narayan Murthy: ”लोकांना वाटते त्यांच्याकडे विशिष्ट फोन अन् घड्याळ असेल तर…,” नारायण मूर्तींनी यशस्वी ब्रँडसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स
qualify as marriage
दीर्घकाळ एकत्र राहण्यास लग्नाचा दर्जा मिळत नाही…
read how mobile phone radiation affect men's fertility
पुरुषांनो, सतत मोबाइल वापरता? कायमस्वरूपी वंध्यत्व निर्माण होऊ शकते; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात..

4 पाती असणारे पंखे कुठे वापरले जातात?

अधिक थंडी असणारे देश म्हणजेच पाश्चिमात्य देशात सिलिंग फॅन पेक्षा एगझोस्ट फॅन्सचा वापर अधिक होतो. याचा वापर आधी म्हंटल्याप्रमाणे हवा खेळती राहण्यासाठी केला जातो. अमेरिका व युरोपियन देशांमध्ये ४ पातींचा पंखा बहुतांश ठिकाणी वापरला जातो.

3 पातीच्या पंख्याचे लॉजिक काय सांगते?

तीन पाती असणाऱ्या पंख्यांचे वैज्ञानिक कारण पाहायचे तर, पंख्यात जितक्या जास्त पाती असतात तितकी कमी हवा लागते त्यामुळे उष्ण देशांमध्ये मुख्यतः तीन पातीचा पंखा वापरला जातो कारण त्याची हवा जास्त लागते तर थंड भागांमध्ये चार पाती असणारा पंखा वापरला जातो कारण त्याचे काम केवळ हवा खेळती ठेवणे इतकेच असते. भारतात उष्ण प्रदेश जास्त असल्याने अधिक भागांमध्ये आपल्याला तीन पातीचे पंखे पाहायला मिळतील.

अभ्यासक सांगतात की पंख्याच्या मोटर क्षमतेनुसार जेवढ्या कमी पाती असतील तितकी जास्त हवा पंखा तयार करतो. म्हणून ३ पाती असणाऱ्या पंख्याने ४ पातीच्या तुलनेत अधिक गार वारा लागतो. याचे आणखी एक कारण म्हणजे पातीच्या वजनाने मोटरची क्षमता कमी अधिक होते. ४ पाती असल्यास मोटारवर अधिक भार पडतो तर याउलट कमी पाती असल्यास मोटार वेगाने फिरू शकते. आपण कमी हवा देणारे टेबल फॅन्स पहिले असतील तर त्यात काही वेळा चार पाती असतात कारण त्यांचा वापर हा मर्यादित जागेसाठी केला जातो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why all indian ceiling fans have three blades and foreign fans have four blades important logic behind summer facts svs

First published on: 20-02-2023 at 12:54 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×